६/०३/२०१५

वास्तव


भावनेच्या भरात
खुप काही बोलतो आपण 
सारासार बुध्दी गहाण ठेवून 
घेतल्या जातात शपथा 
दिले जातात घेतले जातात 
शब्द ...पाळण्यासाठी....
सगळ सुरळीत असेपर्यंत 
गायले जातात गोडवे 
निरपेक्ष नातेसंबंधांचे .
आव आणला जातो 
एकमेकांसाठीच्या त्यागाचा .
केवळ दिखावा,
हे भावनांचे तारू 
व्यवहार नावाच्या 
खडकावर आदळेपर्यंत!
नाती जातात वाहून 
दिशाहीन!
शब्द ,आणाभाका ,शपथा...
विरून जातात विस्मृतीत !
स्वार झालेला असतो प्रत्येकांवर 
केवळ स्वार्थ,
हो फक्त स्वार्थ!


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :प्रल्हाद दुधाळ.
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search