६/०९/२०१५

आशा
माझ्या आयुष्याच्या 
रक्तबंबाळ वाटेवर
तू फूले उधळत आलीस...
तेव्हा,
फुलांनीही आक्रोश केला
स्वतःच्या संपण्यावर !
पण,
त्या फुलांना मी
अजूनही जिवंत ठेवलंय-
माझ्या समाधीवर !
त्या फुलांच्या आशेने तरी
तू पुन्हा पुन्हा
माझ्या जवळ यावीस म्हणून...

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search