६/२२/२०१५

प्रेम …… विश्वासाचं नातं


प्रेमाला स्वच्छंद फुलपाखरासारखं उडू द्यावं 
नेहमी फक्त निरागस प्रेमाचं शिंपण करीत रहावं 
कुठल्याची बंधनात त्याला न अडकवता 
आपल्या मर्जीन त्याला जगू द्यावं 

येतात वादळेही कधी कधी प्रेमात 
शांतपणे त्यांना काळाबरोबर वाहू द्यावं 
प्रेम आपसूकच येत आपल्या प्रेमाजवळ 
कुठल्याही वचनांच ओझं प्रेमावर न लादावं 

प्रेम लोणच्यासारखं मनामनांत मुरु द्यावं 
स्वतःच अस्तित्व विसरून प्रेमाचं होऊन जगावं 
मग कुठलीही गोष्ट प्रेमाला विलग करू शकत नाही 
हेविश्वासाचं नातं असं सहज फुलवत न्यावं . संदर्भ: Facebook Share
लेखक :संजय एम निकुंभ

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search