पडणारा आजचा पाऊस हा डोळ्यांतला
की तुझ्या माझ्या आठवणींतला
चिंब भिजवणारा पाऊस हा श्रावणसरीतला
की पाणावलेल्या मिटलेल्या पापणींतला
थेंबाथेंबानी मनाला भिडणारा पाऊस हा कालचाच
की तु सोबत नसलेल्या जाणिवेतला
गरजुन बरसणारा पाऊस हा वादळातला
की विरहात जगणा-या आकाशाच्या जमिनीतला
दुरावा वाढल्याची चाहुल देणारा पाऊस हा प्रेमातला
की आठवण देणारा तुटलेल्या नात्यातला
पाऊस आजही तोच आहे फक्त तुच नाही
म्हणुनच जपुन ठेवतोय तुलाच तु नसतांना
प्रत्येक थेंबाथेंबाच्या रुपात साठवून ठेवतोय तुला
अन् विचारत जातोय स्वताच स्वताला
पडणारा आजचा पाऊस हा डोळ्यांतला
की तुझ्या माझ्या आठवणींतला...!
संदर्भ: Facebook share
लेखक :कवी-गणेश साळुंखे