मायक्रोमॅक्सने नुकताच आपला आठ इंच स्क्रीन असणारा Canvas Tab P690 लाँच केला आहे. ऑनलाइन आणि रिटेल स्टोअर्समधूनही हा टॅब खरेदी करता येणार आहे. याची किंमत रु. 8,999 आहे.
मायक्रोमॅक्सचे काही अॅपलिकेशन जसे की, हॅलो टिव्ही, सावन, किंडल न्यूज हंट, स्विफ्टकी, हे प्रीलोडेड असणार आहे. यामध्ये 6 ईबुक्स मोफत असणार आहे. तसेच सावन 6 महिन्यासाठी मोफत सबस्क्रिशन असणार आहे. तसेच एक महिना हॅलो टिव्हीचं मोफत सबस्क्रिशन असणार आहे.
मायक्रोमॅक्स Canvas Tab P690चे फिचर्स:
8 इंच एचडी स्क्रीन आणि 1280x800 पिक्सल रेझ्युलेशन
1GB मेमरी आणि 1.3GHz क्वाडकोअर इंटेल एटम प्रोसेसर
अँड्रॉईड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम.
मायक्रोमॅक्सच्या मते, अँड्रॉईड 5.0 लॉलीपॉप अपग्रेड होईल.
8GB की इंटरनल स्टोरेज आणि 32GB पर्यंत मेमरी वाढविता येणार.
2 मेगापिक्सल का फ्रंट कॅमेरा
यामध्ये 4000mAh बॅटरी क्षमता
संदर्भ:ABP News
लेखक :anonymous