६/२१/२०१५

तणावग्रस्त महिलांना हवा असतो अधिक सेक्स!आनंदी असणा-या बायकांपेक्षा नैराश्याने ग्रासलेल्या बायकांना अधिक सेक्स हवा असतो , असा निष्कर्ष एका अहवालात मांडण्यात आलाय. लहान वा मोठ्या तणावाखाली असलेल्या किंवा नैराश्याने ग्रासलेल्या महिलांना अधिक सेक्स करावासा वाटतो. मग भले त्यांचे ल्गन झालेले असो वा नसो. त्यांना फक्त शारिरिक सुख हवे असते.


मेलबर्न मोनॅश विद्यापीठाच्या डॉ. अॅलन आणि त्यांच्या सहका-यांनी दु : खी असलेल्या , नैराश्याने ग्रासलेल्या आणि आनंदी असलेल्या अशा तिन्ही प्रकारच्या महिलांशी बोलून , त्यांच्या लैंगिक अनुभवाची माहिती घेऊन हा निष्कर्ष मांडलाय. नैराश्याने ग्रासलेल्या स्त्रिया अधिक सेक्स हवा असतो. सेक्सबाबत त्यांचे विचारही मोकळे आणि स्पष्ट असतात. केवळ सेक्स करण्यातच नाही तर सेक्समध्ये विविध ' प्रयोग ' करण्यासही त्या उत्सुक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


तणावग्रस्त महिलांना आपल्या नात्याबद्दलच असुरक्षितता जाणवत असते. तसेच आपल्या जोडीदाराला आपली काळजी वाटत नसल्याचा आणि त्याच्या लेखी आपली किंमत नसल्याची भावनाही त्यांना सतावत असते. सेक्समुळे त्यांच्यात जवळीक निर्माण होते आणि त्यांना सुरक्षितता वाटते असेही या अभ्यासक्रमात नमूद करण्यात आले आहे.


डॉ. अॅलन यांच्या म्हणण्यानुसार , अॉस्ट्रेलियातील जोडपी एका आठवड्यात किमान एकदा तर कमाल तिनदा लैंगिक सुखाचा अनुभव घेतात. त्यात एकमेकांची चुंबने घेणे , मिठी मारणे इथपासून इंटरकोर्स करण्यापर्यंतकोणत्याही लैंगिक क्रियेचा समावेश असतो. मात्र , लैंगिक सुख घेण्याबाबत सिंगल वुमन काहीशा राखीवच असतात. , तर , अविवाहीत पुरुष सेक्सबाबत जास्त उत्सुक असतात


पण सगळ्यात मजेशीर बाब अशी की , लैंगिक सुख म्हणजे फ्कत इंटरकोर्स का , तोच याबाबतचा रामबाण इलाज आहे का याबाबत मात्र अभ्यासकांना निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. पण सेक्समुळे तणावग्रस्त तसेच निराश महिलांना त्यांच्या जोडीदाराच्या जवळ येण्याची संधी मिळते असं नमूद करण्यास मात्र ते विसरले नाहीत.


संदर्भ:Zee news
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search