मायक्रोसॉफ्टच्या विंडोज-10 या नव्या आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमच्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला आहे. याच महिन्यात 29 जुलैला जगभरात विंडोज-10 चं लॉन्चिंग होणार आहे. लॉन्चिंगसाठी भारतासह 13 देशांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टमचा आतापर्यंत लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम ‘विंडोज 8.1’ आहे. मात्र, आता विंडोज-10 येणार आहे. दरम्यान, विंडोज 7, 8, 8 ऑपरेटिंग सिस्टम आणखी काही दिवस फ्री अपग्रेड करता येणार आहेत.
लेटेस्ट विंडोज-10 लॉन्च करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट भारतातील नवी दिल्लीसह जगभरातील 13 देशांमध्ये कार्यक्रम आयोजित केले आहेत. सिडनी, टोकियो, सिंगापूर, बीजिंग, नवी दिल्ली, दुबई, नैरोबी, बर्लिन, जोहान्सबर्ग, मॅड्रिड, लंडन, साओ पाऊलो आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये 29 जुलैला विशेष कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉगमधून दिली आहे.
संदर्भ: Facebook Share
लेखक :anonymous