७/१८/२०१५

सखे,तु व्हाटस्अप वरती भेट

रसिकांकडून होत असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन सदरील कविता ऑडीओसह पुनर्प्रसारित करण्यात येत आहे,...

सखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...

तुझ्या-माझ्या मधला,दुवा होऊ दे इंटरनेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... |||धृ||
तुझे अबोल बोलके डोळे
अन् लाजरी-लाजरी नजर
डोळे मिटवण्या आधीच
होतेय डोळ्यांपूढे हजर
माझ्या ह्रदयात तुझ्या,प्रेमाचं गं बेट
सखे,तु व्हाट्सअप वरती भेट,...||१||
तुझे सळसळणारे केस
अन् डूलडूलणारे कान
गोल-गोबरे गाल अन्
भिरभिर फिरती मान
सतवताहेत गं मला,अर्धचावले ओठ
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||२||
या ओसाड माझ्या मनी
तु फुलव प्रेमाचा मळा
मनसोक्त पाहू दे मला
तुझ्या गालावरच्या खळा
जणू मी पिंपळपान,तु झालीस गं देठ
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||३||
आठवण तुझी घेऊनच
ह्रदय माझं धडधडतंय
तुझ्याच ह्रदयासाठी ते
रातंदिस गं तडफडतंय
तुझं व्यसन माझ्या,ह्रदयास जडलंय थेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||४||
तुला पाहिल्या पासुन गं
मलाच मी विसरलोय
माझ्या जीवनातुन तुझ्या
जीवनात मी घसरलोय
तुझ्या जिवनात माझंही,जीवन होईल सेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||५||
माझ्या मनातली भावना
घे तुझ्याही मनात गं
नको करू विलंब आता
तुझ्या-माझ्या प्रेमात गं
माझ्या ह्रदयाचं तुझ्यासाठी,खुलं आहे हे गेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... ||६||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
व्हाटस्अप नंबर :- 9730573783

सदरील कविता ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

कविता आवडल्यास जरूर शेअर करा,परंतु कवितेखालुन नाव काढू नये,....

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search