७/११/२०१५

फेसबुक लाईट- आता फेसबुक app चालवा २जी वर
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने आपलं २जी फ्रेंडली फेसबुक लाईट अॅप भारतात लॉन्च केलंय. सध्यातरी हे अॅप अँड्रॉईडवरच उपलब्ध असून १.५ एमबीचं हे अॅप गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल.

महिन्याच्या सुरूवातीलाच लॉन्च झालेलं हे अॅप २जी इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी बनवलं गेलंय. २जी नेटवर्कवर बऱ्याचदा स्लो नेट असतं त्यामुळे फेसबुकचं अॅप सारखं काम करत नाही. या नवीन अॅपमध्ये पुश नोटीफिकेशन्स आणि जाहिरातीही सपोर्ट करतील, पण न्यूज फीडमध्ये व्हिडीओज दिसणार नाहीत. भारतातील ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे.

ग्राहकांना चॅटींगसाठी आता मेसेंजरही इंस्टॉल कराव लागणार आहे. डेटा कमी खर्च व्हावा यासाठी न्यूज फीडमध्ये मोजक्याच इमेज दिसतील.


संदर्भ: झी news
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search