७/२६/२०१५

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून


हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून,
बोलता बोलता शब्द ओठी जतीलही विरुन,
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही,
कुणीतरी आठवण काढतयं, बाकी काही नाही!!!

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल,
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल,
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास,
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास,
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही,
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही!!!

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका,
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता.
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे.
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे.
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही,
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही!!!

हसायच्या आधी मला
जरा सराव करावा लागतो,
मनावरचा घाव बराच
दाबून धरावा लागतो......


संदर्भ: Facebook Share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search