आज पुनः आपल्या नेहमीच्या ठिकाणी आलो आहे
जरा वेळ तुझ्या आठवणीत स्वतःला विसरायचे आहे
बघ आज गुलमोहर पुनः बहरला आहे
आपल्या प्रेमाच्या आठवणी ही मनात दाटल्या आहेत
ती सायंकाळची वेळ पुनः आली आहे
आणि तुझ्या गप्पा ही रंगल्या आहेत
वार्याची मंद झुळुक देह स्पर्श करते आहे
तुझ्या केसातल्या गजरा ही दरवळतो आहे
पक्ष्यांचि किलबिल ही एक मधुर संगीत देत आहे
आणि तुझे ते निरागस हसु ही खुलत आहे
सूर्य मावळतीला आला आहे
तुही माझ्या मिठीत हळूच समावत आहेस
तुझ्या बंद डोळ्यात स्वप्न कैद झाली आहेत
घडाळ्यातलि वेळ ही अशीच थांबली आहे
आज पुनः गुलमोहर तर बहरला आहे
पण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :नितीन
nickkmbl@gmail.com
8655706608