७/१५/२०१५

।। कधितरी !!



तुझी आसवे ठेवली आहेत जपुन मी
होतील मोती त्यांचे कधीतरी !!
होती साक्षीलाही फुले मोग-याची
बोलतील आणा-भाका कधीतरी !!
होता शिंपडला सडा कुंकवाचा भांगेत मी
ऊलगडेल सौभाग्य माझे कधीतरी !!
केश काळे कुरळे जणू वाटा नागमोडी
येशील या वाटेवरून माघारी कधीतरी !!
सरली रात्र केंव्हा मज कळलेच नाही
होईल पहाट पुन्हा आपल्या प्रितीची कधीतरी !!




संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :श्री.प्रकाश साळवी
(मराठी कविता समुहा साठी पाठविलेली कविता-कवि प्रकाश साळवी)

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search