७/१२/२०१५

फेसबुक अनफ्रेंडफेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळं वैतागला असाल आणि अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर आता काळजी घ्यायला हवी. कारण आतापर्यंत ज्याला अनफ्रेंड केलं त्याला ते कळत नसे, पण आता तसं नसून ज्या मित्राला अनफ्रेंड कराल त्याला तसा मॅसेज क्षणार्धात मिळणार आहे. यामुळं ज्या मित्राला अनफ्रेंड कराल तो मित्र गमाविण्याची शक्यता बळावली असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.‘हू अनलिस्टेड मी ऑन फेसबुक’ नावाचं एक नवं अ‍ॅप बाजारात आलं असून, या अ‍ॅपमुळं ज्यांचं नाव अनफ्रेंड झालं, त्याला तात्काळ मॅसेज जाणार आहे. उठता, बसता अन् बिनकामाचे पोस्ट टाकण्याची सवय अनेक मित्रांना असते. आतापर्यंत अशा मित्रांना अनफ्रेंड केलेलं कळत नव्हतं पण आता तसं नाही.

या आयएसओ बेस्ड अ‍ॅपमुळं आपण गोत्यात येण्याची शक्यता आहे. तसंच या अ‍ॅपच्या साहाय्यानं एखाद्या मित्रानं फेसबुक अकाऊंट बंद केलं किंवा अकाऊंट बंद असलेला मित्र पुन्हा परतला तरीही त्याची माहिती हे अ‍ॅप देणार आहे. ही सुविधा फेसबुकची नाही, अ‍ॅप स्वतंत्रपणे खरेदी करावं लागणार आहे. 


संदर्भ: Internet
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search