८/१४/२०१५

अंडा करी


लागणारे साहित्य:

दोन ते चार उकडलेली अंडी कवच काढून साफ केलेली, दोन उकडलेले बटाटे, टोमॅटो, कांद्याची पेस्ट, आल-लसून पेस्ट, पाव चमचा साखर, अर्धा चमचा जीरे, पाव कप दुध, पाव चमचा काश्मिरी मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे- जिरे पूड, थोडेसे  काजू , अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा खसखस, दोन चामचे तूप, एक  तेजपण,दोन ते तीन लवंग, जराशी दालचिनी आणि मीठ चवीनुसार.


कसे तयार कराल:

आधीच काजू गरम पाण्यात थोडया वेळ भिजवत ठेवा. नंतर काजू आणि खसखसची पेस्ट करून घ्या.आता एका कढईत तेल तापत ठेवा. त्यात तेजपान, लवंग, दालचिनी आणि जीरे टाका.जीरे तडतडलायला लागल्यावर त्यात आल-लसून पेस्ट, कांद्याची पेस्ट टाका. कांदा तेलात लाल होई पर्यत शिजवा नंतर त्यात टोमॅटो पेस्ट, हळद, धन-जीरपूड, काश्मिरी मिरची पावडर, किचन किंग मसाला,साखर टाका.झाकण ठेवून एक वाफ आणा.मिश्रणाला तेल सुटले कि त्यात काजू-खसखस पेस्ट, मीठ, गरम मसाला, दुध टाका.दोन  मिनिटांनी त्यात अंडी मधून सुरीने कप देऊन घाला नंतर बटाटे घाला आणि आवश्यक असल्यास पाणी घाला. उकळी आल्यावर गैस बंद करा.आता त्यावर तूप सोडा आणि कोथिबीरने सजवा. अंडा करी तयार हि करी चपाती किंवा भाता सोबत सर्व्ह करा.

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search