८/१४/२०१५

आषाणे धबधबा
सध्या मुंबईत मस्त पाऊस पडतोय. या पावसाळ्यात भटकण्यासाठी एका छान पर्यटनस्थळाची ओळख करुन देणार आहोत. हा आहे भिवपुरीचा आषाणे धबधबा...

कर्जतच्या आषाणे धबधब्यावर सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी होतेय. सध्या पाऊसही मस्त पडतोय. अख्खं कर्जत हिरवंगार झालंय आणि या सगळ्यावर क़डी करणारे धबधबे डोंगरद-यांतून वाहू लागलेत. माथेरानच्या जंगलातून येणारं पाणी आशाणे गावातल्या डोंगरावरून खाली पडतं.

भिवपुरी स्टेशनपासून जवळच हा धबधबा आहे. कर्जत नेरळ रस्त्यावर कर्जतपासून अवघ्या ४ किलोमीटरवर आषाणे गाव आहे. धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांकडून प्रत्येकी दहा रुपये प्रवेश फी आकारली जाते. पावसाळ्यातल्या वीकेण्डसाठी हा धबधबा मस्त ऑप्शन आहे. एखादी सहल तुम्हीही प्लॅन करा.

संदर्भ: Zee News
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search