अर्धा किलो चिकनचे तुकडे मध्यम आकाराचे कापून, तीन ते चार लहान कांदे, एक चमचा लसूण पेस्ट, एक चमचा आलं पेस्ट, एक चमचा गरम मसाला, २ चमचा कोल्हापूरी चटणी, हळद, मीठ चवीनुसार आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
कसे तयार कराल:
आधी चिकन स्वच्छ करुन पाणी काढून टाकावे.नंतर हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापूरी चटणी हे सर्व साहित्य चिकनला लावून ठेवणे.आता कढईत तेल टाकून गरम करणे त्यात बारीक चिरलेले कांदे टाकणे, लालसर रंग आल्यावर मसाला लावलेलं चिकन त्यात टाकून वर झाकण ठेवून शिजवून घेणे.शिजल्यावर गॅस बंद करुन कोथिंबीर टाकणे.आणि चिकन मसाला तयार. गरमच चपाती किंवा रोटी बरोबर सर्व करा.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार