८/१४/२०१५

चिकन तंदुरी


लागणारे साहित्य:

एक किलो चिकन, दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या, एक इंच आले, एक लहान कांदा, दोन चमचे मिरचीपूड, एक चमचा काश्मिरी मिरचीपूड, अर्धा चमचा धणेपूड, एक चमचा जिरेपूड, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे व्हिनेगर, दोन लिंबू, दोन चमचे तूप, मीठ, थोडा लाल रंग ( Food color), पाव कप दही, एक लहान तुकडा कच्ची आणि पापी पपई.

कसे तयार कराल:

आधी आले, लसुन, कांदा वाटून त्यांचा रस काढून घ्यावा.आता दही फेटून त्यात आले, लसूण यांचा रस, धनेपूड, जिरेपूड, दोन्ही प्रकारच्या मिरचीपूड, पपईची पेस्ट, मीठ, व्हिनेगर, लिंबूरस, फूडकलर फेटून मिक्स करून  घ्यावे.नंतर फेट्लेला दही मसाला चिकनला आतून बाहेरून चोळावा. मसाला मुरण्यासाठी चिकन चार साडेचार तास तसेच झाकून ठेवावे.नंतर शेगडीवर भाजावे. शेगडीच्या दोन्ही बाजूला शेगडीपेक्षा दोन ते तीन इंच उंच कोणत्याही पेट्या ठेवाव्या, त्यावर सळईवरील चिकन ठेवून फिरवून फिरवून पंचवीस ते तीस मिनिटे भाजावे.चिकन शिजले, मऊ झाले की, त्यावर गरम केलेले तूप ओतावे वरून गरम मसाला टाकावा सळईमधून चिकन काढून प्लेटमध्ये ठेवावे.लिंबाच्या चकत्या, कांद्याच्या रिंग्ज, पुदिना चटणीबरोबर तंदुरी चिकन सर्व करावे.

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : स्वप्नाली मोरे
छायाचित्रे:anonymous  

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search