८/११/२०१५

जेव्हा कधी मागे वळुन पाहिन


जेव्हा कधी मागे वळुन पाहिन 
तेव्हा तुझ्या नी माझ्या आठवणींच गोड हसु चेहर्यावर असाव 
.
अस आपल प्रेम असाव...
.
गोड तुझ्या आठवणींनला मागे टाकुन पुढे जाणार्या माझ्या पावलांना थांबवाव..
.
अस आपल प्रेम असाव...
.
चालणार्या प्रत्येक वाटेवर तुझ्या भासांना टाळुन पुढे जात राहव.
तरी तुझ स्वप्न मनी असाव....
.
अस आपल प्रेम असाव...
.
जरी नसावा संवाद तुझ्यात नी माझ्यात, तरी नजरेच्या बोलाने ते मी समझुन जाव.....
.
अस आपल प्रेम असाव...
.
तुझ्या हस्याच्या त्या गोडव्यात मी हरवुन जाव, आणि स्वतः ला तुझ्या आठवणीत वेड कराव....
.
अस आपल प्रेम असाव...
.
तुझ्या ओठांच्या बोलात मी रमुन जाव,
तुझ्या रुसलेल्या चेहर्या वर माझ्या आठवणींनच हसु असाव....
.
अस आपल प्रेम असाव...
.
होणार्या प्रत्येक त्रासाच कारण मीच असाव, तरी माझ्यविणा तुला करमत नसाव....
.
अस आपल प्रेम असाव...
.
चौपाटीच्या किनार्यावर तु आणि मी सोबत असाव आणि येणार्या प्रत्येक लाटे बरोबर तु ही माझ्या मिठीत याव......
.
अस आपल प्रेम असाव...
.
येणार्या प्रत्येक संकटाला सामोर जाव...
आणि आयुष्यभर तु आणि मी सुखी रहाव.....
.
अस आपल प्रेम असाव...


.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :-विशाल हरेल

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search