९/१७/२०१५

गणेश उत्सवगणेशोत्सव गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घराघरांत आणि सार्वजिनिक मंडळांतश्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. कोंकणामध्ये, आरतीच्या नंतर देवें म्हणतात. अन्यत्र आरतीनंतर गणपतीला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटतात. अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव, नद्या, समुद्र यात विसर्जन होते.

गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. हा गणेश उत्सव भारतात, महाराष्ट्र या शिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये तसेच, भारताबाहेरही ब्रिटन, अमेरिका, फिजी, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, कंबोडिया, कॅनडा, ब्रह्मदेश, आणि त्रिनिदाद व टोब्यागो या देशांमध्ये साजरा केला जातो. मुंबई आणि पुण्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात होयो. पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग आणि केसरी वाडा. या व्यतिरिक्त दगडूशेठ हलवाई, मंडई, बाबू गेनू आणि जिलब्या मारुती ही काही इतर मोठी मंडळे आहेत. पुण्यात हिरा बाग मंडळ हे भव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई मध्ये लालबागचा राजा हा सर्व गणपतींत मोठा मानलेला गणपती आहे.


संदर्भ: mr.wikipedia.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search