ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक
६२७ - निनेवेहची लढाई - हेराक्लियसच्या बायझेन्टाईन सैन्याने खुस्रो दुसर्‍याच्या पर्शियन सैन्याला हरविले.

अकरावे शतक
१०९८ - पहिली क्रुसेड - मा'अरात अल् नुमानची कत्तल - शहराची तटबंदी फोडून क्रुसेडर आत घुसले व २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांनी मानवमांस खाल्ले.

अठरावे शतक
१७१९ - बॉस्टन गॅझेटचे प्रकाशन.
१७८१ - अमेरिकन क्रांती-उशान्तची दुसरी लढाई - रिअर ॲडमिरल रिचर्ड केम्पेनफेल्टच्या एच.एम.एस.व्हिक्टरी या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलाच्या स्क्वॉड्रनने फ्रेंच तांड्याला हरविले.
१७८७ - पेनसिल्व्हेनिया अमेरिकेचे संविधान मान्य करणारे दुसरे राज्य ठरले.

विसावे शतक
१९०१ - न्यू फाउंडलंडमधील सेंट जॉन गावातील सिग्नल हिल येथे गुग्लियेल्मो मार्कोनीने प्रथम अटलांटिक महासागरापलीकडचा रेडियो संदेश पकडला.
१९११ - ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने भारताची राजधानी कोलकातायेथून दिल्लीला हलविली.
१९२५ - इराणच्या मजलिसने रझा खानची शाहपदी निवड केली.
१९३९ - हिवाळी युद्ध-तोल्वाजार्विची लढाई - फिनलंडच्या सैन्याने प्रथम सोवियेत युनियनविरूद्ध विजय मिळविला.
१९४१ - ब्रिटनने बल्गेरियाविरूद्ध युद्ध पुकारले.
१९६३ - केन्याला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९६४ - जोमो केन्याटा केन्याच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९७९ - ऱहोडेशियाचे नामांतर. नवीन नाव झिम्बाब्वे.
१९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक.
१९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
२००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.
२००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म
१२९८ - ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक आल्बर्ट दुसरा.
१५७४ - डेन्मार्कची ऍन, इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याची राणी.
१८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
१९४० - शरद पवार, भारतीय राजकारणी.
१९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता.
१९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू
८८४ - कार्लोमान, पश्चिमी फ्रँक्सचा राजा.
१५७४ - सलीम दुसरा, ऑटोमन सुलतान.
१६८५ - जॉन पेल, ब्रिटिश गणितज्ञ.
१८४३ - विल्यम पहिला, नेदरलँड्सचा राजा.
१९१३ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
१९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.
१९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक.
१९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
२००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी.संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous


वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita