ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक
६२७ - निनेवेहची लढाई - हेराक्लियसच्या बायझेन्टाईन सैन्याने खुस्रो दुसर्याच्या पर्शियन सैन्याला हरविले.

अकरावे शतक
१०९८ - पहिली क्रुसेड - मा'अरात अल् नुमानची कत्तल - शहराची तटबंदी फोडून क्रुसेडर आत घुसले २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न मिळाल्याने त्यांनी मानवमांस खाल्ले.

अठरावे शतक
१७१९ - बॉस्टन गॅझेटचे प्रकाशन.
१७८१ - अमेरिकन क्रांती-उशान्तची दुसरी लढाई - रिअर ॲडमिरल रिचर्ड केम्पेनफेल्टच्या एच.एम.एस.व्हिक्टरी या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलाच्या स्क्वॉड्रनने फ्रेंच तांड्याला हरविले.
१७८७ - पेनसिल्व्हेनिया अमेरिकेचे संविधान मान्य करणारे दुसरे राज्य ठरले.

विसावे शतक
१९०१ - न्यू फाउंडलंडमधील सेंट जॉन गावातील सिग्नल हिल येथे गुग्लियेल्मो मार्कोनीने प्रथम अटलांटिक महासागरापलीकडचा रेडियो संदेश पकडला.
१९११ - ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने भारताची राजधानी कोलकातायेथून दिल्लीला हलविली.
१९२५ - इराणच्या मजलिसने रझा खानची शाहपदी निवड केली.
१९३९ - हिवाळी युद्ध-तोल्वाजार्विची लढाई - फिनलंडच्या सैन्याने प्रथम सोवियेत युनियनविरूद्ध विजय मिळविला.
१९४१ - ब्रिटनने बल्गेरियाविरूद्ध युद्ध पुकारले.
१९६३ - केन्याला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९६४ - जोमो केन्याटा केन्याच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९७९ - ऱहोडेशियाचे नामांतर. नवीन नाव झिम्बाब्वे.
१९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी. जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक.
१९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
२००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.
२००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म
१२९८ - ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक आल्बर्ट दुसरा.
१५७४ - डेन्मार्कची ऍन, इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याची राणी.
१८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
१९४० - शरद पवार, भारतीय राजकारणी.
१९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता.
१९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू
८८४ - कार्लोमान, पश्चिमी फ्रँक्सचा राजा.
१५७४ - सलीम दुसरा, ऑटोमन सुलतान.
१६८५ - जॉन पेल, ब्रिटिश गणितज्ञ.
१८४३ - विल्यम पहिला, नेदरलँड्सचा राजा.
१९१३ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
१९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.
१९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक.
१९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.

२००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी.
Blogger द्वारा समर्थित.