लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->









ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक

१५४५ - ट्रेंटची समिती सुरू.
१५७७ - सर फ्रांसिस ड्रेक पृथ्वी प्रदक्षिणेला प्लिमथ, इंग्लंड येथून निघाला.


सतरावे शतक
१६४२ - एबेल जान्स्झून तास्मान न्यू झीलँडला पोचला.
एकोणिसावे शतक[संपादन]
१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - फ्रेडरिक्सबर्गच्या लढाईत कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. लीने युनियन जनरल ऍम्ब्रोस ई. बर्नसाइडला हरविले.


विसावे शतक
१९३७ - दुसरे चीनी-जपानी युद्ध-नानजिंगची लढाई - जपानी सैन्याने नानजिंग काबीज केले.
१९३८ - ज्यूंचे शिरकाण - साख्सेनहौसेनहून आणलेल्या १०० कैद्यांनी हांबुर्गजवळील नॉएनगॅम कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प बांधला.
१९३९ - दुसरे महायुद्ध-रिव्हर प्लेटची लढाई - ब्रिटीश नौदलाच्या क्रुझर एच.एम.एस. एक्झेटर, एच.एम.एस. अजॅक्स व एच.एम.एन.झेड.एस. अकिलिसशी दिलेल्या झुंजीत पराभव अटळ दिसत असता जर्मनीच्या कॅप्टन हान्स लँग्सडॉर्फने आपली पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पी बुडविली.
१९४१ - दुसरे महायुद्ध - हंगेरी व रोमेनियाने अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारले.
१९७४ - माल्टा गणतंत्र झाले.
१९७७ - अमेरिकन सरकारचे डी.सी.३ जातीचे विमान एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ कोसळले. २९ ठार. मृतांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिलचा बास्केटबॉल संघ.
१९८१ - पोलंडमध्ये जनरल वॉयसियेक यारूझेल्स्कीने लश्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला.
१९९६ - कोफी अन्नान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी.
२००० - आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ऍल गोरनी हार मान्य केली.


एकविसावे शतक
२००१ - पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
२००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२००२ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हिया,
लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.

२००३ - इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले.
२००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.


जन्म
१५२१ - पोप सिक्स्टस पाचवा.
१५३३ - एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
१५५३ - चौथा हेन्‍री, फ्रान्सचा राजा.
१५८५ - हॉथोर्न्डेनचा विल्यम ड्रमोंड, स्कॉटिश कवी.
१६७८ - याँग्झेंग, चीनी सम्राट.
१८१६ - वेर्नर बॉन सीमेन्स, सीमेन्स उद्योग समूहाचा पाया घालणार्‍या सीमेन्सचा जन्म
१८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
१८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.
१९१३ - आर्ची मूर, मुष्टियोद्धा
१९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक
१९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका

मृत्यू
१०४८ - अल बिरूनी, ईराणी गणितज्ञ.
११२४ - पोप कॅलिक्स्टस दुसरा.
१२०४ - फ्रेडरिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
१९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९९४ - विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.
१९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.
२००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.







source:wikipedia

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita