१२/१४/२०१५

डिसेंबर १४


ठळक घटना आणि घडामोडी

नववे शतक
८६७ - एड्रियन दुसरा पोपपदी.
८७२ - जॉन आठवा पोपपदी.

तेरावे शतक
१२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार.

सोळावे शतक
१५४२ - मेरी स्टुअर्ट (मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स) राणीपदी.
एकोणिसावे शतक
१८१९ - अलाबामा अमेरिकेचे २२वे राज्य झाले.

विसावे शतक
१९११ - रोआल्ड अमुंडसेन च्या नेतृत्त्वाखाली ओलाव ब्यालँड, हेल्मर हान्सेन, स्वेर्र हॅसेल आणि ऑस्कार विस्टिंग दक्षिण ध्रुवावर पोचले.
१९३९ - हिवाळी युद्ध - लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.
१९४६ - संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.
१९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान.
१९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी.

एकविसावे शतक
२०१२ - अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील न्यूटाउन शहरातील प्राथमिक शाळेत माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २० लहान मुले व ८ इतर व्यक्ती मृत्युमुखी.

जन्म
१००९ - गो-सुझाकु, जपानी सम्राट.
१५०३ - नोस्ट्राडॅमस, फ्रांसचा गणितज्ञ व भविष्यवेत्ता.
१५४६ - टायको ब्राहे, डेन्मार्कचा अवकाशशास्त्रज्ञ.
१८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा.
१९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ.
१९२४ - राज कपूर, भारतीय अभिनेता.

मृत्यू
१५४२ - जेम्स पाचवा, स्कॉटलंडचा राजा.
१७८८ - चार्ल्स तिसरा, स्पेनचा राजा.
१७९९ - जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला अध्यक्ष.
१९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.

प्रतिवार्षिक पालन
शहीद बुद्धीजीवी दिन - बांगलादेश
राज्य दिन - अमेरिका-अलाबामा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search