१२/१५/२०१५

डिसेंबर १५

ठळक घटना आणि घडामोडी

सहावे शतक
५३३ - टिकामेरोनची लढाई - व्हॅन्डाल राजा जेलिमर आणि रोमन सेनापति बेलिसारियस यांच्या सैन्यात.

सातवे शतक
६८७ - संत सर्जियस पहिला पोपपदी.

तेरावे शतक
१२५६ - मोंगोल सेनानी हुलागु खानने ईराणमधील अलामतचा बालेकिल्ला हश्शाशिन काबीज करून ऊध्वस्त केले. मोंगोलांची ईशान्य आशियातील आगेकूच सुरू.

अठरावे शतक
१७९१ - व्हर्जिनीयाच्या विधानसभेने मान्य केल्यावर अमेरिकन नागरिकांचा हक्कनामा कायदा म्हणून अस्तित्त्वात आला.

विसावे शतक
१९४५ - दुसरे महायुद्ध - जनरल डग्लस मॅकआर्थरने हुकुमनाम्याद्वारे जपानमधील शिंटो धर्माची राज्यधर्म म्हणूनची मान्यता काढूल घेतली.
१९६१ - ऍडोल्फ ऐकमनला पंधरा आरोपांखाली मृत्यूदंड. आरोपांमध्ये ज्यूंचे शिरकाण, मानवतेविरूद्ध गुन्हे आणि बेकायदा संस्थाचे सदस्यत्त्व, वगैरेची गणना.
१९७६ - सामोआला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्त्व.
१९९४ - नेटस्केप नॅव्हिगेटरची . आवृत्ति प्रकाशित.
१९९४ - पलाउला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्त्व.
१९९७ - शारजाजवळील वाळवंटात ताजिकीस्तानचे टी.यु.१५४ जातीचे विमान कोसळले. ८५ ठार.

एकविसावे शतक

जन्म
३७ - नीरो, रोमन सम्राट.
१३० - लुसियस व्हेरस, रोमन सम्राट.
१२४२ - राजकुमार मुनेताका, जपानी शोगन.
१९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू.

मृत्यू
१०२५ - बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
१०७२ - आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये.

१२६३ - हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search