ठळक घटना आणि घडामोडी

चौथे शतक
३२४ - रोमन सम्राट लिसिनीयसने पदत्याग केला

बारावे शतक
११८७ - क्लेमेंट तिसरा याची पोपपदी निवड

अठरावे शतक
१७७७ - अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनच्या काँटिनेन्टल आर्मीने व्हॅली फोर्ज येथे हिवाळी मुक्काम केला

विसावे शतक
१९०५ - लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू झाली
१९१६ - पहिले महायुद्ध-व्हर्दुनची लढाई - फ्रांसच्या सैन्याने चढाई करणाऱया जर्मन सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले
१९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन
१९६३ - झांझिबारला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य. सुलतान हमुद बिन मोहम्मद राजेपदी
१९७२ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले
१९९७ - सिल्क एरची फ्लाइट १८५ हे बोईंग ७३७-३०० जातीचे विमान इंडोनेशियात पालेम्बँग जवळ मुसी नदीत कोसळले. १०४ ठार

एकविसावे शतक
२००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण
२०१० - सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यातील विक्रमी ५० वे शतक केले. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्‌स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला
२०१० - राहुल द्रविडने कसोटी सामन्यातील १२,००० धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्‌स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला

जन्म
१५५४ - फिलिप विल्यम, ऑरेंजचा राजकुमार
१६८३ - फिलिप पाचवा, स्पेनचा राजा
१९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू
१७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी
१९३४ - प्रतिभा पाटील - भारतीय राजकारणी, भरताच्या १२व्या रष्ट्रपती
१९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू

मृत्यू
४०१ - पोप अनास्तासियस पहिला
१३७० - पोप अर्बन पाचवा
१७३७ - जेम्स सोबेस्की, पोलंडचा युवराज
१७४१ - व्हिटस बेरिंग, नेदरलँड्सचा शोधक
१९२७ - अशफाक उल्ला खान - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १९००)
१९२७ - राम प्रसाद बिस्मिल - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १८९७)
१९२७ - रोशन सिंग - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १८९२)
१९३९ - हान्स लँगडोर्फ, जर्मन आरमारी अधिकारी
१९५३ - रॉबर्ट अ‍ँड्र्युज मिलिकान ,नोबेल पारितोषिक विजेता
१९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक
२०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती

प्रतिवार्षिक पालन
स्वातंत्र्य दिन - झांझिबार
गोवा मुक्ती दिन
source:wikipedia.org

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita