१२/२०/२०१५

डिसेंबर २०



ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक
१५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले.

एकोणिसावे शतक
१८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण.
१८६० - दक्षिण कॅरोलिना युनायटेड स्टेट्सपासून फुटून निघाले.

विसावे शतक
१९१७ - रशियात पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची (चेका) स्थापना.
१९५२ - अमेरिकन हवाई दलाचे सी.१२४ जातीचे विमान वॉशिंग्टन राज्यात मोझेस लेक येथे कोसळले. ८७ ठार
१९७३ - स्पेनच्या पंतप्रधान ॲडमिरल लुइस कारेरो ब्लांकोचा माद्रिदमध्ये कार बॉम्बने खून.
१९८९ - ऑपरेशन जस्ट कॉझ - अमेरिकेने पनामातील मनुएल नोरिगाचे सरकार उलथविण्यासाठी सैन्य पाठविले.
१९९५ - नाटोचे शांतिसैन्य बॉस्नियामध्ये दाखल.
१९९५ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ९६५ हे बोईंग ७५७ जातीचे विमान कोलंबियात कालीजवळ कोसळले. १६० ठार.
१९९९ - पोर्तुगालने मकाउचे बेट चीनला परत केले.

एकविसावे शतक
२००१ - आर्थिक अडचणीत सापडलेल्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दि ला रुआला राजीनामा देणे भाग पडले.

जन्म
१५३७ - जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.

मृत्यू
२१७ - पोप झेफिरिनस.


source:wikipedia


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search