१२/२१/२०१५

डिसेंबर २१ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक
१६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.

विसावे शतक
१९१३ - आर्थर विनचे वर्ड क्रॉस, हे पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित.
१९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.
१९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.
१९७९ - ऱहोडेशियाच्या स्वातंत्र्यासाठीच्या ठरावाचा मसुदा लंडनमध्ये ठरला.
१९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
१९८८ - लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन ऍम फ्लाइट १०३ या बोईंग ७४७ जातीच्या विमानात लॉकरबी, स्कॉटलंड वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.
१९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ९५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली गाडी पकडली. तोरे पिकासो वरील हल्ला टळला.
२००१ - देशावरील आर्थिक संकट आणि शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दे ला रुआची हकालपट्टी.

एकविसावे शतक
जन्म
१७९५ - लेओपोल्ड फॉन रांक, जर्मन इतिहासकार.
१८०४ - बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८७९ - जोसेफ स्टालिन, १९२२ ते १९५३ पर्यंतसोवियेत युनियनचा नेता.
१९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती.
१९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश
१९४२ - हू चिंताओ, चीनचे नागरी गणतंत्रचा राष्ट्राध्यक्ष.
१९५४ - क्रिस एव्हर्ट-लॉईड, ब्रिटीश टेनिस खेळाडू.
१९६७ - मिखाइल साकाश्विलि जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष.


मृत्यू
१२९५ - प्रोव्हेन्सची मार्गेरित बेरेन्जर, फ्रांसचा राजा लुई नववा याची राणी.
१३०८ - हेसीचा हेन्री पहिला.
१८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स
१९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.
२००४ - औतारसिंग पेंटल भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.

१९१३ - आर्थर विनsource:wikipedia

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search