ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक
१६०३ - ऑट्टोमन साम्राज्याचा सुलतान महमद तिसरा याचा मृत्यू. अहमद पहिला सुलतानपदी.

एकोणिसावे शतक
१८०७ - अमेरिकन काँग्रेसने एम्बार्गो ऍक्ट केला. अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध संपुष्टात.
१८०९ - अमेरिकन काँग्रेसने नॉन इंटरकोर्स ऍक्ट केला. एम्बार्गो ऍक्ट रद्द. युनायटेड किंग्डम व फ्रांस शिवाय अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध परत सुरू.
१८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली.
१८६४ - विल्यम टेकुमेश शेर्मनची समुद्रास कूच समाप्त. सवाना, जॉर्जिया युनियन सैन्याने काबीज केले.
१८८५ - इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला.

विसावे शतक
१९०९ - भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली.
१९३७ - न्यूयॉर्कमध्ये लिंकन टनेल वाहतुकीसाठी खुली.
१९६३ - क्रुझ शिप लाकोनिया मडेरापासून २९० कि.मी. उत्तरेस जळाली. १२८ ठार.
१९८४ - न्यूयॉर्कच्या भुयारी रेल्वेत बर्नार्ड ह्युगो गोत्झने चार गुंडांना गोळ्या घातल्या.
१९८९ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे अध्यक्षपद सोडले. इयोन इलेस्क्यु अध्यक्षपदी.
१९८९ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
१९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
१९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ७५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली अजुन एक गाडी पकडली. (पहा डिसेंबर २१)
१९९९ - तांद्जा ममदु नायजरच्या राष्ट्राध्यक्षपदी.

एकविसावे शतक
२००१ - काबुल, अफगाणिस्तानमध्ये बुरहानुद्दीन रब्बानीने सत्तेची सूत्रे हमीद करझाईला दिली.
२००१ - रिचार्ड रीड, शू बॉम्बरने अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ६३मध्ये आपल्या बुटात लपविलेली स्फोटके उडविण्याचा प्रयत्न केला.

जन्म
११७८ - अंतोकु, जपानी सम्राट.
१६६६ - गुरू गोबिंद सिंघ, शिख धर्मगुरू.
१८८७ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
१९०३ - आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपती.
१९१२ - लेडी बर्ड जॉन्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनची पत्नी.
१९७२ - व्हेनेसा पॅरेडिस, फ्रेंच गायिका.

मृत्यू
१६०३ - महमद तिसरा, ऑट्टोमन सुलतान.
१८८० - जॉर्ज इलियट, ब्रिटीश लेखिका(टोपण नाव).
१९७९ - नरहर रघुनाथ फाटक, भारतीय ईतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक.
इ.स. १९९५ - जेम्स मीड, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता
१९९७ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.
१९९७ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.

प्रतिवार्षिक पालन
तोजी - जपान.

मातृदिन - इंडोनेशिया.
Blogger द्वारा समर्थित.