लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->


ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक
१२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.

अठरावे शतक
१७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.

एकोणिसावे शतक
१८१४ - घेंटच्या तहाने १८१२चे युद्ध संपले.
१८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.
१८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.

विसावे शतक
१९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.
१९४१ - दुसरे महायुद्ध - जपानने कुचिंग आणि हाँगकाँग जिंकले.
१९४६ - फ्रांसच्या चौथ्या प्रजासत्ताकची स्थापना.
१९५१ - लिब्याला इटलीपासून स्वातंत्र्य इद्रीस पहिला राजेपदी.
१९५३ - न्यू झीलँडमध्ये लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार.
१९६६ - अमेरिकन सैन्याने भाड्याने घेतलेले कॅनेडेर सी.एल.४४ प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार.
१९६८ - अपोलो ८मधील अंतराळ यात्री चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले.
१९७९ - एरियान प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण.
१९९७ - सिद अल-अंत्री हत्याकांडात ५०-१०० ठार.

एकविसावे शतक
२००३ - ई.टी.ए.ने माद्रिदमधील चमार्तिन स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला.

जन्म
३ - गॅल्बा, रोमन सम्राट.
१९६६ - जॉन, इंग्लंडचा राजा.
१८४५ - जॉर्ज, ग्रीसचा राजा.
१८६७ - कांतारो सुझुकी, जपानचा ४२वा पंतप्रधान.
१८६८ - इमॅन्युएल लास्कर, जर्मन बुद्धिबळ खेळाडू.
१८८१ - हुआन रमोन हिमेनेझ, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
१८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.
१९२२ - ऍव्हा गार्डनर, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
१९२३ - जॉर्ज पॅटन, अमेरिकन सेनापती.
१९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
१९२७ - मेरी हिगिन्स क्लार्क, अमेरिकन लेखक.
१९३४ - स्ट्येपान मेसिच, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
१९३४ - तार्या हेलोनेन, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
१९५७ - हमीद करझाई, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
१९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.
१९६१ - इल्हाम अलियेव, अझरबैजानचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू
१५२४ - वास्को दा गामा, पोर्तुगीज खलाशी.
१८१३ - गो-साकुरामाची, जपानी सम्राट.
१८६३ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
१८७२ - विल्यम जॉन मॅकॉर्न रँकिन, ब्रिटिश डॉक्टर आणि अभियंता.
१८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.
१९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.
१९८० - कार्ल डॉनित्झ, जर्मन दर्यासारंग आणि नाझी जर्मनीचा शेवटचा नेता.
१८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.
१९९० - थॉर्ब्यॉन एग्नर, नॉर्वेजियन लेखक.
१९९९ - होआव बॅप्तिस्ता दि ऑलिव्हियेरा फिग्वेरेदो, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
१९९९ - मॉरिस कूवे दि मुरव्हिल, फ्रांसचा पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन

भारतीय ग्राहक दिन.

source:wikipedia

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita