१२/२८/२०१५

डिसेंबर २८



ठळक घटना आणि घडामोडी
पाचवे शतक
४१८ - संत बॉनिफेस पहिला पोपपदी.

अकरावे शतक
१०६५ - लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर ऍबी खुली.

सतरावे शतक
१६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.

एकोणिसावे शतक
१८३२ - जेम्स सी. कॅल्हूनने अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
१८३५ - दुसर्‍या सेमिनोल युद्धात ओसिओलाने सेमिनोल योद्ध्यांसह अमेरिकन सैन्यावर हल्ला चढविला.
१८३६ - दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्य व एडिलेड शहराची स्थापना.
१८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.
१८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.
१८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.

विसावे शतक
१९०८ - मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५,००० ठार.
१९७३ - अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनने गुलाग आर्किपेलागो प्रकाशित केले.
१९९५ - कझाखस्तानमधील बैकानूर अंतराळतळावरून भारताच्या आय.आर.एस.-१सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९९९ - तुर्कमेनिस्तानने सपार्मुरात नियाझोवला आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.

एकविसावे शतक
२००० - एड्रियन नास्तासे रोमेनियाच्या पंतप्रधानपदी.
जन्म
११६४ - रोकुजो, जपानी सम्राट.
१८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार.
१८५६ - वुड्रो विल्सन, अमेरिकेचा २८वा राष्ट्राध्यक्ष.
१९०३ - जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व तर्कशास्त्रज्ञ.
१९२२ - स्टॅन ली, कॉमिक्स लेखक, स्पायडर मॅन, हल्क, एक्स मेन, कॅप्टन अमेरिका, इ. काल्पनिक व्यक्तिमत्त्वांचा जनक.
१९२४ - मिल्टन ओबोटे, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष.
१९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती.
१९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती.
१९६९ - लिनस तोरवाल्ड्स, फिनलंडचा प्रोग्रॅमर, लिनक्स या गणकयंत्रप्रणालीचा जनक.
१९७२ - पॅट्रिक राफ्टर, ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू.
मृत्यू
१३६७ - आशिकागा योशियाकिरा, जपानी शोगन.
१४४६ - प्रतिपोप क्लेमेंट आठवा.
१५०३ - पियेरो लोरेंझो दी मेदिची, फ्लोरेंसचा राज्यकर्ता.
१६९४ - मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.
१७०३ - मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सुलतान.
१८५९ - थॉमस मॅकॉले, ब्रिटीश कवी, राजकारणी व इतिहासकार.
१९१६ - एदुआर्द स्ट्रॉस, ऑस्ट्रियाचा संगीतकार.
१९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.
१९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.
१९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.
२००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.
२००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.
२००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.
२००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.
२००४ - जेरी ऑर्बाख, अमेरिकन अभिनेता.

२००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search