१२/२९/२०१५

डिसेंबर २९ठळक घटना व घडामोडी
एकोणिसावे शतक
१८१३ - १८१२चे युद्ध - ब्रिटीश सैनिकांनी बफेलो, न्यूयॉर्क जाळले.
१८३५ - न्यूएकोटाचा तह - चेरोकी जमातीची मिसिसिपीच्या पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.
१८४५ - टेक्सास अमेरिकेचे २८वे राज्य झाले.
१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - चिकासॉ बायूची लढाई संपली.
१८९० - युनाइटेड स्टेट्स सेव्हन्थ कॅव्हेलरी(अमेरिकेचे ७वे घोडदल) कडून सू राष्ट्राच्या ४०० पुरुष, स्त्री व बालकांची वुन्डेड नी येथे कत्तल.
१८९१ - थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.

विसावे शतक
१९११ - सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.
१९१२ - विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग कॅनेडाच्या पंतप्रधानपदी.
१९३४ - जपानने १९२२च्या वॉशिंग्टन नाविकी तह व १९३०च्या लंडन नाविकी तहातून अंग काढून घेतले.
१९३७ - आयरीश मुक्त राज्य संपुष्टात. त्याऐवजी आयर्लंडहा देश अस्तित्त्वात.
१९४० - दुसरे महायुद्ध-ब्रिटनची लढाई - लुफ्तवाफेने लंडनवर जबर बॉम्बफेक केली. ३,००० नागरिक ठार.
१९७२ - ईस्टर्न एरलाइन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.
१९७५ - न्यूयॉर्कच्या लाग्वार्डिया विमानतळावर बॉम्बस्फोट. ११ ठार.
१९८९ - वाक्लाव हावेल चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९९२ - ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो कोलोर डी मेलोने राजीनामा दिला.
१९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल.
१९९८ - ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंबोडियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १०,००,०००हून अधिक माणसांना मारण्यात आले होते.

एकविसावे शतक
२००१ - पेरूची राजधानी लिमाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात आग. २७४ ठार.
२००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.

जन्म
१७०९ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
१८०० - चार्ल्स गुडईयर, अमेरिकन शोधक व उद्योगपती.
१८०८ - ऍन्ड्र्यू जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.
१८०९ - विल्यम इवार्ट ग्लॅड्स्टोन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.
१९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.
१९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
१९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.
१९६० - डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू
१९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.

१९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.

source:wikipedia

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search