ठळक घटना व घडामोडी
एकोणिसावे शतक
१८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.
१८५३ - गाड्सडेन खरेदी - अमेरिकेने गिला नदीच्या दक्षिणेची व रियो ग्रान्देच्या पश्चिमेची ७७,००० वर्ग किलोमीटर जमीन मेक्सिकोकडून १,००,००,००० डॉलरच्या बदल्यात विकत घेतली.
१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - यु.एस.एस. मॉनिटर उत्तर कॅरोलिनातील केप हॅटेरास जवळ बुडाली.
१८८० - ट्रान्सवाल प्रजासत्ताक झाले. पॉल क्रुगर अध्यक्षपदी.
१८९६ - फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये होजे रिझालला फायरिंग स्क्वॉडने मृत्यूदंड. (पहा - रिझाल दिन).
१८९७ - नातालने झुलुलँड बळकाविले.

विसावे शतक
१९०३ - शिकागोच्या इरोक्वो थियेटरला आग. ६०० ठार.
१९२२ - सोवियेत संघराज्याची स्थापना.
१९२४ - एडविन हबलने जगात अनेक आकाशगंगा असल्याचा दावा सिद्ध केला.
१९२७ - एशियातील सगळ्यात जुनी भुयारी रेल्वे, गिंझा लाईन टोक्योमध्ये सुरू.
१९४० - कॅलिफोर्नियातील पहिला द्रुतगतीमार्ग, अरोयो सेको पार्कवे खुला.
१९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.
१९४४ - ग्रीसचा राजा जॉर्ज दुसर्‍याने राज्य सोडले.
१९४७ - रोमेनियाचा राजा मायकेलने राज्य सोडले.
१९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर.
१९६५ - फर्डिनांड मार्कोस फिलिपाईन्सच्या अध्यक्षपदी.
१९७२ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेने उत्तर व्हियेतनामवरील बॉम्बफेक थांबविली.
१९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.
१९९७ - अल्जीरियात अतिरेक्यांनी चार गावातील ४०० लोकांना ठार मारले.

एकविसावे शतक
२००० - मनिलात काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.
२००१ - आर्जेन्टिनात ब्युएनोस एर्सच्या रिपब्लिका क्रोमेन्योन नाईटक्लबमध्ये आग. १९४ ठार.
२००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.

जन्म
३९ - टायटस, रोमन सम्राट.
१६७३ - तिसरा एहमेद, ऑट्टोमन सुलतान.
१८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.
१८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी.
१८८४ - हिदेकी तोजो, दुसर्‍या महायुद्धातील जपानी पंतप्रधान.
१८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक.
१९३५ - ओमार बॉन्गो, गॅबनचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू
१५९१ - पोप इनोसंट नववा.
१८९६ - होजे रिझाल, फिलिपाईन्सचा क्रांतिकारी.
१९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.
१९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.
१९८६ - हॅरोल्ड मॅकमिलन, ब्रिटनचा पंतप्रधान.
१९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.
२००१ - हर्षद महेता, भारतीय शेरदलाल.

प्रतिवार्षिक पालन
रिझाल दिन - फिलिपाईन्स.


Blogger द्वारा समर्थित.