१२/०९/२०१५

डिसेंबर ९


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक
१७९३ - अमेरिकन मिनर्व्हा, न्यूयॉर्कचे पहिले दैनिक प्रकाशित.
एकोणिसावे शतक
१८२४ - अयाकुशोची लढाई - ऍंतोनियो होजे दी सुकरच्या नेतृत्त्वाखाली पेरूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्पॅनिश दलाला हरवून पेरू स्वतंत्र केले.
१८३५ - टेक्सासच्या गणराज्याने सान ऍंतोनियो जिंकले.
१८५६ - ईराणमधील बुशहरने ब्रिटीश लश्करासमोर शरणागति पत्करली.
१८८८ - अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वत: तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरूवात केली.
विसावे शतक
१९३७ - दुसरे चीन-जपान युद्ध-नानजिंगची लढाई - लेफ्टेनंट जनरल असाका यासुहिकोच्या नेतृत्त्वाखाली जपानी सैन्याने नानजिंगवर हल्ला केला.
१९४० - दुसरे महायुद्ध - रिचर्ड ओ'कॉनोरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय व ब्रिटीश सैनिकांनी ईजिप्तच्या सिद बरानीतील ईटालियन सैन्यावर हल्ला केला.
१९४१ - दुसरे महायुद्ध - चीनी गणराज्य, कोरियन गणराज्याचे तात्पुरते सरकार व क्युबाने जर्मनी व जपान विरूद्ध युद्ध पुकारले.
१९४५ - जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.
१९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू.
१९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
१९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.

जन्म
१४४७ - चेंगह्वा, चीनी सम्राट.
१५०८ - गेम्मा फ्रिसियस, डच गणितज्ञ व नकाशेतज्ञ.
१५९४ - गुस्तावस अडोल्फस, स्वीडनचा राजा.
१६०८ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.
१९१९- ई.के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.
१९२३ - बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.
१९४६ - सोनिया गांधी, इटलीत जन्मलेली भारतीय राजकारणी.

मृत्यू
११६५ - माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
१४३७ - सिगिस्मंड, पवित्र रोमन सम्राट.
१५६५ - पोप पायस चौथा.
१६६९ - पोप क्लेमेंट नववा.
१७०६ - पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.

प्रतिवार्षिक पालन
टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिनसंदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search