१२/०७/२०१५

भाताचे वडे





साहित्य:

एक कप भात शिळा असो व ताजा कोणताही चालेल,ज्वारीचे पीठ,एक,चमचा तांदुळाचे पीठ,अर्धा चमचा जीरे, पाव चमचा हळद,२ चमचे मिरचीची पेस्ट,एक चमचा धणेपूड,मुठभर कोथिंबीर बारीक चिरून,मीठ,तेल.



कृती:

सर्व प्रथम भात जर फडफडीत असेल तर पाण्याचा हबका मारून वाफवून नरम करून घ्यावा ताजा भातासारखा.

नरम झालेल्या भातात जीरे, हळद, मिरची, धणेपूड, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करावे. तांदुळाचे पीठ घालावे आणि मळावे. नंतर भातात मावेल इतके ज्वारीचे पीठ चमच्याने घालावे. मळून अंदाजाने पीठ घालावे, थोडे तेल हातावर घेउन गोळा मळावा. पीठाचे एक लहान गोळे करून हातावर थापावे,हाताला तेल लावावे त्यामुळे हे वडे हाताला चिटकनार नाहीत, मधे एक भोक पडून गरम तेलात मध्यम आचेवर तळावेत.लालसर रंग आल्यावर तेलातून काढून घ्यावेत आणि टॉमेटो सॉस किंवा नारळाच्या चटणी सोबत सर्व करावेत

संदर्भ: facebook share
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search