लागणारे साहित्य:
पाच  कप कुरमुरे,दोन  मध्यम  आकाराचे कांदे बारीक चिरून घ्या,दोन मध्यम टोमॅटो बारीक चिरून घ्या,एक कप फरसाण किंवा आवडीनुसार,अर्धा कप बारीक शेव आवडीनुसार कमी जास्त करू शकता,अर्धा कप कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी,शक्य असल्यास कैरीचे बारीक तुकडे,हिरवी चटणी व आंबट गोड चटणी,अर्धा चमचा काळे मीठ,अर्धा चमचा चाट मसाला,साधे मिठ चवीपुरते,


कसे तयार कराल:


आधी  मोठ्या भांड्यात कूरमुरे घ्यावे त्यात आधी फरसाण, चाट मसाला, काळे मिठ, कांदा घालावा, गरजेनुसार दोन्ही चटण्या घालाव्यात, टोमॅटो, लिंबू घालावे. व्यवस्थित मिक्स करावे. जर गरज असल्यास मीठ घालावे आणि भेल तयार.

 तयार भेळ सर्व जरताना वरून शेव आणि कोथिंबीर पेरावी.
संदर्भ:Facebook share
लेखक : anonymous
Blogger द्वारा समर्थित.