ठळक घटना आणि घडामोडी

आठवे शतक
७७१ - कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रँकिश सम्राटपदी.

एकोणिसावे शतक
१८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.

१८७२ - ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.

विसावे शतक
१९१८ - पहिले महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.

१९४३ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.

१९५२ - लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.

१९५४ - मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.

१९५८ - डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.

१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.

१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.

१९७१ - अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.

१९७७ - मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.

१९८४ - चीनने नवीन संविधान अंगिकारले.

१९८४ - हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.

१९९१ - ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी अँडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.

एकविसावे शतक
२००८ - कॅनडाची संसद बरखास्त.

जन्म
१५५५ - हाइनरिक मैबॉम, जर्मन कवी व इतिहासकार.
१५९५ - ज्यॉँ चेपलेन, फ्रेंच लेखक.
१६१२ - सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.
१७९५ - थॉमस कार्लाईल, इंग्लिश लेखक व इतिहासकार.
१८४० - क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.
१८५२ - ओरेस्ट ख्वोल्सन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
१८९२ - फ्रांसिस्को फ्रँको, स्पेनचा हुकुमशहा.
१९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.
१९३२ - रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
१९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.

मृत्यू
१९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
१९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.


वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita