१२/११/२०१५

ब्रेड पिझ्झा


लागणारे साहित्य:

चार ब्रेड स्लाईस,अर्धा कप किसलेले पनीर, अर्धा कप कांद्याचे पातळ काप, अर्धा कप पिझ्झा सॉस, अर्धा कप भोपळी मिरचीचे पातळ काप,टोमॅटोच्या दहा ते बारा पातळ  कापलेल्या चकत्या,अर्धा ते पाऊण कप किसलेले चिझ,चवीनुसार मिठ,सुक्या लाल मिरच्यांचा चुरा गरजेप्रमाणे.

कसे तयार कराल:

आधी ओव्हन ४०० F वर सेट करू घ्या. चिरलेल्या सर्व भाज्यांवर थोडे मिठ पेरून घ्या,प्रत्येक ब्रेड स्लाईसवर पिझ्झा सॉस लावा,त्यावर टोमॅटो, कांदा आणि भोपळी मिरची घाला,वरून किसलेले पनीर टाका, ड्राय बेसिल पाने चुरडून भरवित,आवडीनुसार चिज घालावे आणि साधारण १० मिनीटे बेक करावे किंवा चिज वितळून किंचीत सोनेरी झाले कि लगेच  बाहेर काढावे आणि गरमागरम सर्व्ह करावे.



संदर्भ: facebook share
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search