१२/१४/२०१५

सेक्स सीन पाहून किशोरवयींमध्ये वाढते कामुकता


एका नव्या अभ्यासानुसार मुलांमध्ये लैंगिकता वाढीचे कारण स्पष्ट झाले आहे. अनेक चित्रपटात सेक्सची भडक दृश्य दाखविली जातात. त्यामुळे मुलांच्या कामुकतेत वाढ होत असते. त्यादृष्टीने किशोरवयीन मुले विचार करतात. यातूनच त्यांची लैंगिकता वाढीला लागत असल्याचे संशोधनाव्दारे स्पष्ट झाले आहे.

मनोवैज्ञानिकांनी ७०० हिट झालेले सिनेमांचा अभ्यास केला. या हिट सिनेमात सेक्स दृश्य दाखविण्यात आली आहेत. हेच चित्रपट किशोरवयीन मुलांनी पाहिल्यानंतर त्यांच्यातील लैंगिकता वाढल्याचे स्पष्ट झाले.  त्यांच्यातील लैंगिकता ही भडक चित्रपट पाहिल्यानंतर सक्रिय होते.

हॉलिवूडमधील चित्रपटात मोठ्याप्रमाणात सेक्सची दृश्य दाखविली जात असल्याने याचा परिणाम किशोरवयीन मुलांवर होत आहे. सेक्सची दृश्य पाहून ही मुले लैंगिक संबध ठेवण्यासाठी प्रवृत्त होतात. मात्र सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर करण्याची काळजी घेत नाहीत, असेही करण्यात आलेल्या अभ्यासात म्हटले आहे. याबाबतचे वृत्त डेली टेलिग्राफने दिले आहे. न्यू हॅंपशायरच्या डार्क कॉलेजमधील संशोधन करणाऱ्यांच्या हे लक्षात आले आहे की, युवा लोक भविष्यातील मैत्रीबाबत जास्त जोखीम उचलत असतात.


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search