माणगाव तालुक्यामध्ये एका अनगड ठिकाणी कुडरुगडाचा किल्ला दबा धरून बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुडरुगड मोसे खोर्यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवजी राजांचे समकालीन सहकारी होते. पासलकर कुडरुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात

सुळाक्याच्या आकाराचा माथा असलेला कुडरुगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणार्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कुडरुपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे. या वस्तीमध्ये कुर्डाईदेवीचे मंदिर आहे. म्हणून किल्ल्याला कुडरुगड असे नाव पडले आहे. कुडरुगडला जाण्यासाठी दोन-तीन मार्ग आहेत. त्यातील प्रचलित मार्ग म्हणजे माणगावकडून एसटी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे लागते. माणगाव निजामपूर शिरवली जिते असा तासाभराचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास एसटी अथवा खाजगी वाहनानेही करता येतो.
जिते गावातून गडावर जाणारी पायवाट 00 साली झालेल्या प्रचंड पावसामुळे नष्ट झाली. डोंगराचा मोठा कडा ढासळल्यामुळे ही वाट बंद झाली. त्यामुळे जिते गावातून कुडरुगडाचा डोंगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन किमी अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे. समुद्र सपाटीपासून ८८२ मीटर उंचीच्या कुडरुगडास जाण्यासाठी मोसे खोर्यातूनही जाता येते. त्यासाठी पुणे-पानशेत मार्गे गाडीने जाऊन मोसे खोर्यातील धामणगाव गाठावे लागते. धामणगावजवळून पायवाटेने लिंग्या घाटाच्या माथ्यावर पोहोचून लिंग्या घाटाने खाली उतरावे लागते. अध्र्या घाटातच कुडरुगडाचा किल्ला आहे. यासाठी धामणगावापासून तीन तासांची पायपीट करावी लागते. हा मार्ग जरी अडचणीचा असला तरी निर्सगाची सोबत आणि त्याचे रौद्रत्व मनाला भुरळ पाडणारे आहे.ताम्हिणी घाटातील सर्वात दक्षिणेकडील एका वळणावरून कुडरुगड दिसतो. येथे उतरण्यास सर्वात सोयीचे आहे. येथून खिंडीतील वाटेने उंबर्डीला तासा दीडतासात पोहोचता येते. त्यामुळे वेळ, श्रम अंतराची बचत होऊ शकते. उंबर्डीमधील प्राचीन मंदिराचे अवशेष पाहून समोरचा डोंगर चढून आपण कुडरुपेठमध्ये दीड तासामध्ये पोहोचू शकतो. कुडरुपेठेतील कुर्डाईदेवीचे दर्शन घेऊन दहा मिनिटांमध्ये किल्ल्यात पोहोचता येते. वाटेत पाण्याचे टाके आहेत. या टाक्यांतील पाण्याचा वापर उन्हाळ्यामध्ये गावकरी करतात. हे टाके पाहून पुढे आल्यावर काही चढाईकरून आपण सुळाक्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या भागामध्ये बुरुज तसेच तटबंदी असे दुर्ग अवशेष पाहायला मिळतात. कुडरुगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळाक्याच्या पोटात असलेली नैसर्गिक गुहा. छताचा भाग हळूहळू कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठय़ा विस्ताराची ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्यायोग्य नाही. पण या प्रचंड गुहेच्या छताने माथ्यावरच्या सुळाक्याचे वजन कसे पेलले असेल हे पाहून मात्र आश्चर्य वाटते.

येथून उत्तर कड्यावरील हनुमंत बुरुजावर जाता येते. येथे हनुमंताची मूर्ती आहे. ही देखणी मूर्ती मात्र सध्या एकसंघ राहिली नाही. येथून पूर्व बाजूला आल्यास खालच्या दरीचे उत्तम दर्शन घडते. या बुरुजाला कडेलोटाचा बुरुज असेही म्हणतात. गडावरच्या मुख्य अशा मोठय़ा सुळक्याजवळ एक लहान सुळकाही आहे. या दोन्ही सुळक्यांमध्ये जाण्यासाठी असलेली वाट काहीशी अवघड आहे. छोटा पण आटोपशीर आकाराचा कुडरुगड पाहण्यासाठी तासाभराचा अवधी पुरेसा आहे.संदर्भ:https://www.facebook.com/Amhichtevede
लेखक :anonymous

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita