मित्रांनो इंटरनेट
वर एक भन्नाट गोष्ट माझ्या पाहण्यात आली, वाटल सर्वांना प्रसादारखी वाटावी,
google play वर “Marathi books” अस लिहून search केल. त्यात काही
मजेशीर दिसलं ते तुमच्या समोर मांडतोय.
Soffer Publishing ची काही पुस्तके नजरेत आली, त्यात जागतिक भाषा (इतर देशातल्या) आणि मराठी भाषा यांचा शब्दकोश स्वरुपात आहेत. या पुस्तकाचं वर पृष्ठ (front cover) पाहिलं तर अस दिसत कि ज्या देशातली भाषा आहे तिचा ध्वज आणि “महाराष्ट्र नवनिर्माण सेना” या महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचा ध्वज सोबत दिसतोय.
उदा.
जर इंग्लिश भाषा आणि
मराठी भाषा यांचा शब्दकोश असेल तर अमेरिका आणि “महाराष्ट्र नवनिर्माण सेना” या
पक्षाचा ध्वज सोबत दाखवण्यात आलेला आहे.
मला अस वाट्त यावर
जरा विचार करायला हवा आपण एक मराठी म्हणूनही कि बाहेरचे आपल्याबद्दल काय विचार आणि
कशी study करत आहेत आपल्या बद्दल..भले ते जाणतेपणे असो वा अजाणते पणे.
इथे दिसतंय कि एक
भाषा म्हणून देशाचा झेंड्याचा उल्लेख होतोय आणि मराठी साठी भारतातील एका राजकीय पक्षाच्या
उल्लेख होतोय आणि सर्वात जमेशीर म्हणजे हिंदी भाषे साठी भारताचा झेंडा आणि मराठी
साठी राजकीय पक्ष्याचा.
जी पुस्तके paid आहेत पैसे देऊन विकत घेणार आहे
मराठी माणूस, मराठी youth यावर काय प्रभाव पडेल याचा हि विचार करायला हवा, आणि जर
हि चूक असेल तर दुरुस्त करावी.
हीच पुस्तके amazon वर आहेत, मला एक चिंता
वाटतेय इथे कि जर या ग्लोबल वातावरणात जर आपण आपल्या भाषेच स्वरूप नीट मांडत नसू,
आपल वेगळे पण दाखवू शकलो नाही, आणि जगाला सांगू शकलो नाही तर आपल्या भाषेचे काय
हाल होतील विचार करा.....जगात मराठी कशी पोचतेय याचा देशील आपण आता विचार करायला
हवा.
लेखक:मयूर पाटील
९८६७९९०५२०