चाले ही तुडवित रान, जणू भासे लाजरीचे पान
मंद हसुनी थोड़ी, नजरेतुनी करी खोडी
मोहुनि घेई ध्यान, जणू भासे लाजरीचे पान
मंजुळ तिचा ध्वनि, सुंदर सजवुनि
गीत गाई बेभान, जणू भासे लाजरीचे पान
खुळु खुळु पैंजण, खिणी खिणी वाजवुन
घाले ही थैमान, जणू भासे लाजरीचे पान
हीचं अल्लड हसण, तसं बालिश रुसण
करी नखरे ही छान, जणू भासे लाजरीचे पान
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :आशीष अवसरे©
ashishavsare@gmail.com