१२/०८/२०१५

मराठी विनोदांची पोपटपंचीसकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागीतले.......
पती :- किती मागासलेली आहेस तु? विज्ञान किती पुढे गेले आणी तु अजुन वर्तमानपत्र मागतेस....??? हा माझा टॅब घे......
बायको टॅब घेते आणी त्याने झुरळ मारते....।।
नवरा बेशुध्द.
तात्पर्य : पत्नी जे मागते ते तिला डोकं न लावता द्या, तुमची हुशारी फक्त ऑफीस पुरतीच ठेवा ....
बायको:- अहो,तुमचा तो मित्र प्रसाद, त्याच ज्या मुली बरोबर लग्न ठरलय ना, ती मुलगी चांगली नाही, ती व तिच्या घर चे भांडखोर आहेत, तीला काही घरकाम येत नाही. वाट लागेल प्रसादची जर तिच्या बरोबर लग्न केल तर...
नवरा:-(गप्प)....
बायको:- तुम्ही का काही बोलत नाही..?
नवरा:-(गप्प)...
बायको:-तुम्ही प्रसादला सांगा तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणुन...
नवरा:-(गप्प)...
बायको :(चिडुन)..तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची. जाउन सांगा त्याला की तिच्या बरोबर लग्न करु नको.
नवरा: मी कोणाला काही सांगायला जाणार नाही...
बायको:(चिडुन) का?
नवरा: मला सांगायला कोण आल होत का ?
बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या.
बाई : मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू.
बंडू : बाई , तुकारामाची ' तू ' पहिली का दुसरी ?
बाईंनी बंडू ला झोड झोड झोडला.
बंडू ला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला.

पुणेकर :
एक तरुण पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला
माझे पाकीट हरवले आहे.
मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत.
टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन,
फ़क्त 85 रूपये पाहिजेत.
तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायला मला लाज वाटत आहे.
पुणेकर म्हणाला -
यात लाज वाटण्याच काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते !
हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबर हा 100 रूपये रिचार्ज करा, आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा !
तूझी अड़चन दूर होईल !!!
ती व्यक्ती काही न बोलता निघुन गेली
स्त्री प्रवासी - कंडक्टर दिड टिकीट द्या
कंडक्टर - ते कसे?
स्त्री प्रवासी - माझे एक फुल आणि माझ्या हाफ मॅड पतीचे अर्धे
कंडक्टर - तरी तुम्हाला दोन फुल घ्यावे लागतील
स्त्री प्रवासी - ते कसे?
कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणुन अर्धे आणि तुम्ही दीड शहाण्या असे दोन फुल.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search