१२/०४/२०१५

तुळशीपत्र- शशांक रांगणेकर


जग बंधू नंतरचे 

बंधू नंतरचे जगच बदलले होते दोन्ही पारिवार
जणू एकत्रच आले होते ,माजी अमुलाग्र बदलल्या होत्या ,मी आणि चैतू त्यांना आपल्या मुलासारखेच वाटत होतो ,फक्त हा बदल बंधूंच्या निर्वाणा नंतरच झाला होता
माझे एम बी बी स चे शेवटचे वर्ष होते परीक्षेच्या तयारी च्या वेळी युवराज स्वतः लक्ष घालून होते त्यांच्या अवाढव्य व्यवसायात मग्न असूनही त्यांचे लक्ष सदैव माझ्याकडे केद्रित होते ,माझ्या पेक्षा काहीच वर्षाने मोठा असणारा हा युवक माझ्या वडिलांच्या भूमिकेत वावरताना मला दिसत होता जणू बंधूच मला परत मिळाले होते ,माझ्या अभ्यासाची खोली त्यांच्या खोलीच्या बाजूलाच होती रात्र रात्र अभ्यास करून मी थकून पुस्तकात डोके टेकून झोपलो तर मला हळूच उठवत आणि म्हणत पंचम झोप आता ,सकाळी अभ्यास कर ,जबरदस्तीने झोपायला लावत ,सकाळी उठवत ,अभ्यासाला बसायला सांगत आणि एखाद्या लहान मुलासारखी माझी
काळजी घेत. माझ्या परीक्षेत ते स्वतःचे वायाच ते विसरले होते ,.
एका रात्री अभ्यास करता करता मी पुस्तकावर डोके ठेऊन झोपलो ,मला हळूच उठवून युवराज म्हणाले पंचम
शांत झोप आता उद्या अभ्यास करा ,युवराजांच्या प्रेमाने मनाचे सर्व बांध फुटले डोळे अश्रुनी डबडबून आले ,युवराजांनी डोळे पुसले
मला म्हणाला पंचम बंधूंची आठवण येतेय का युवराज म्हणाले ,नाही युवराज त्यांची आठवण येत नाही मला कारण तुमच्यात ते माझ्यासाठी वावरताना दिसताहेत ते नाही आहेत असे वाटतही नाही मला मग तेसमोर असताना आठवण कशी येईल ,आठवण समोर नसलेल्यांची येते. सकाळी उठलो तेव्हा युवराज फोने वर बोलत होते
१५ दिवस कुठेही जाता येणार नाही मला त्यांच्या सेक्रेटरीला ती सांगत होते ,माझी परीक्षा १५ दिवसात संपणार होती ,माझ्यासाठीच युवराज कुठेही बाहेर जाणार नव्हते ,एक महत्वाची बिसनेस मिटिंग होती ती पण त्यांनी पुढे ढकलली होती , परीक्षेच्या आदल्या रात्री मी अभ्यास करताना युवराज खोलीत आत आले मला हाताला धरून बंधूंच्या फोटो समोर घेऊन गेले हात जोडून म्हणाले बंधू आपल्या पंचमची उद्या पासून परीक्षा आहे त्याला आशीर्वाद द्या ,भरलेल्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ,माझे डोळे पुसतात पुसता युवराज म्हणाले पंचम रडता का?" नाही युवराज हे आनंदाश्रू आहेत तुम्ही माझ्यासाठी मागायच्या अगोदरच बंधूनी मला आशीर्वाद दिला आहे ,हा बघा म्हणून" युवराजना मिठी मारून मी म्हणालो ,आणि डोळे पुसायची पाळी माझी होती". युवराज स्वतः मला सोडायला येत ,परीक्षेनंतर घरी घेऊन जायलाही येत ,माझा पूर्ण ताबा त्यांनी घेतला होता ,माझ्यापेक्षा तेच ज्यास्त दबावाखाली वाटत होते जणू तेच परीक्षा देत होते , युवराज स्वतः मला सोडायला येत ,परीक्षेनंतर घरी घेऊन जायलाही येत ,माझा पूर्ण ताबा त्यांनी घेतला होता ,माझ्यापेक्षा तेच ज्यास्त दबावाखाली वाटत होते जणू तेच परीक्षा देत होते ,
मला परीक्षेत हमखास यश मिळणार ह्याची मला पूर्ण खात्री वाटत होती , परिक्षेच्या शेवटच्या" दिवशी परीक्षा आटोपल्यावर माझ्या हातात ५०० रुपयांची नोट देऊन म्हणाले पंचम तुमच्या मित्रामैत्रीणींना घेऊन आज सिनेमाला जा ' ,बर युवराज" मी म्हणालो. सिनेमाची दोन तीकीटे घेउन मी घरी आलो, त्यांना म्हणालो" चला युवराज निघूया आपण कुठे , सिनेमाला उशीर होईल नाही तर" ,मी अरे मित्रांना घेऊन जा म्हणालो" मी,मग तुम्ही काय शत्रू आहात का माझे ,आणि असाल तर असा शत्रू आवडेल मला , ,माजी आज आम्ही बाहेरच खाऊ काही तरी ,चालेल न युवराज ,होहो चालेलच काय धावेलाही" असे म्हणून युवराज कपडे करायला वर गेले ,खाली आलेल्या युवराजन कडे मी डोळे विस्फारून बघत होतो युवराज एका निळ्या जीन आणि निळया टी शर्ट मध्ये खाली आले नेहमी फोरमल मध्ये असणाऱ्या युवराजांचे मित्र रूप मला लोभसवाणे वाटले ,"लवकर यारे" माजी म्हणाल्या ",हो फक्त पंचमची एखादी मैत्रीण नाही भेटली तर आम्ह्ही दोघेही लवकर येऊ" ,हसत युवराज म्हणालेआणि तुमची मैत्रीण भेटली तर ,मग शहाण्या मुलासारखे तुम्ही एकट्याने लवकर यायचे मिश्कील पणे युवराज म्ह"णाले . बगल्यातून खाली उतरलो गाडी चे दार उघडत ड्रायवर म्हणाला कुठे जायचं? कुठेही नाही ",माझ्या बाईक वर बसून युवराज मला म्हणाले सर्व नोकर मंडळी तो भरत मिलाप पाहत होते , वरती ग्यालरीत माजी . डोळ्याला पदर लावत .उभ्याहोत्या
सिनेमा बघता बचत युवराज मधेच म्हणाले सिनेमा बघताय का नाही मी हि नाही मी म्हणालो मग चला तर लंग द्रीवे वर समुद्रावर जाऊया हो जरूर आम्ही दोघेही दोन्ही मित्र समुद्र किनारी आले वाळु तुडवत तुडवत चालू लागले , सिनेमा हॉलच्या बाहेर पडलो ,'आता मी बाईक चालवणार मी म्हणालो ओ.क युवराज होकारले' भाऊ ,मित्र ह्या साऱ्या नात्यांचे अगणित रेशम बंध एकमेकात कसे गुंफत गेले ते कळले पण नाही
निकालाचा दिवस जसजसा जवळ येताहोता तास तशी उत्कंठा वाढत होती ,माझ्यापेक्षा युवराज जास्त अस्वस्थ वाटत होते निकालाच्या पूर्व संध्येला विद्यापीठातून मला फोये आला आणि मी सर्वच विषयात पहिला आल्याचे विद्यापीठाने मला कळवले ,सर्व विषयात मी रेकॉर्ड ब्रेक केले होते ,माझ्या यशाने माझ्या पेक्षा युवराजच जास्त आनंदित झाले होते ,बंधू च्या खोलीत मला घेऊन जाऊन ते स्वामी आणि बंधूंच्या फोटो समोर उभे राहिले ,माझ्या मस्तकावर हात ठेऊन म्हणाले बंधू तुम्ही जिंकलात आपला पंचम पहिला आला ,स्वामींची भक्ती तुम्हाला फळली ,मनाचे बांध फुटून आनंद त्यांच्या डोळ्यावाटे आसवाच्या रूपाने वाहत होता .अति परिश्रमाने थकलेल्या माणसाचा थकवा अचानक दूर झालेल्या माणसासारखे ते
वाटत होते. शांतपणे बिछान्यावर पडले ,त्यांना गाढ झोप कधी लागली ते कळलेही नाही , सकाळी हि ते झोपलेले होते मला मात्र सकाळीच जाग आली युवराजांच्या चेहऱ्यावर समाधानाची साय पसरली होती.
मी बंधूंच्या घरी असल्याचे माझ्या सर्व मित्रांना परचीताना माहित असल्याने ते सर्व सकालीचा पासून बंगल्यावर येत होते आई बाबा चैतू माजी सगळे आनंदाच्या सर्व सीमा पार करून उल्हासित झाले होते ,सर्वांची सरबराई युवराज जातीने करत होते संध्याकाळी माजीने मला ओवाळले आई नि आणि त्यांनी माझी दृष्ट काढली मी त्यांच्या पाया पडताच पोटाशी धरून त्या ढसा ढसा रडल्या बंधूंच्या फोटो कडे बघून म्हणाल्या" आज तुमच्या ह्या धाकट्या मुलाचे यश पहायला तुम्ही हवे होतात ",आई नि त्यांना सावरले .एक लिफाफा त्यांनी माझ्या हातात दिला ,
'काय आहे त्यात?, मी म्हणालो तुम्हीच बघा ,माजी म्हणाल्या आत एक एक करोड रुपयांचा चेक होता आणि propertyचे कागद पत्र ,हे कशासाठी? मी म्हणालो
'तुमच्या बंधूंची इच्छा पूर्ण करण्या साठी' , शहरातल्या मध्यवर्ती भागात
गोरगरीबांसाठी निशुल्क सेवेचे एक रुग्णालय बांधावे अशी त्यांची इच्छा होती. रात्री युवराज एकटेच बसले होते मी आल्यावर म्हणाले' पंचम आता तुम्हाला जराही वेळ मिळणार नाही पुढचे शिक्षण आणि हॉस्पिटलचे बांधकाम दोन्ही बघायाचे आहे'
तुम्हाला व्यक्तीशः आम्हालाही काही तरी भेट द्यावीशी वाटते काय? हवे आमच्या छोट्या भावाला' ,दादा मला एक वाहिनी पाहिजे आहे ,मी म्हणालो जरूर दिली
तुम्हाला वाहिनी पण एका अटीवर आम्हाला दादा म्हणून हाक मारणारे कोणी नाही तुम्ही मात्र तीहाक मारत
असाल तर तर तुमची मागणी मंजूर'. युवराज म्हणाले
मग चल तर दादा' मी म्हणालो कुठे ?दादा म्हणाले वहिनी शोधायला' मी म्हणालो काळाचा ओघ चालूच होता ,दादांचा विवाह सोहळा संपन्न झाला ,,वाहिनीचे
आगमन झाले ,विवाह सोहळ्याला प्रचंड जनसमुदाय लोटला होता ,बंधूंच्या
लोकप्रियतेची एक जिवंत साक्ष ,नवागत वधूचे नाव माजीनी .भक्ती .ठेवले ,सोन पावलांनी आलेल्या नाव वधुनी सर्वाचेच मन जिंकून घेतले होते ,एका घरंदाज घराण्याची सर्व संस्कार क्षमता घेऊन नव वधू आली होती ,,वाहिनीही
व्यवसायाने डॉक्टर होत्या ,घरातल्या सर्वांचे पालकत्व त्यांच्याकडे गेले , एक
दिवस संध्याकाळी दादांनी मला बोलावले आणि सांगितले कि व्यवसायाच्या
निमित्त्याने त्यांना परदेशी जावे लागेल आणि साधारण एक महिन्याचा अवधी लागेल ,दादांना मी गळ घातली कि त्यांनी वाहिनीनाही बरोबर घेऊन जावे.दादा कसेबसे तयार झाले वाहिनी म्हणाल्या पंचम इथले कोण बघेल माजीना काय वाटेल? ,आई माझ्या सह्य्याला आली म्हणाली "तू जाग" युवराजन बरोबर इथली काळजी करू नकोस आम्ही दोघी आहोत इथे ,आईच्या आश्वासनावर वाहिनी तयार झाल्या , , जायच्या आदल्या दिवशी दादा आणि वाहिनी माझ्या कडे बोलत बसले होते ,
मधेच मला म्हणाले पंचम काय आणू तुम्हाला ,'बाहुला मी म्हणालो' ,काय 'बाहुला लहान का आहात तुम्ही ?,नाही मोठा झालोय म्हणून काका म्हणून मला हांक
मारणारा पुतण्या मला भेट म्हणून पाहिजे दादा ,फार वाय्हात झाला आहेस तू दादा म्हणाले' आणि वाहिनीकडे बघून म्हणाले तुमच्या लाडक्या दिराची फरमायिश ऐकलीत तुमची अनुमती आहेना?
,तिचीही आहे आणि आम्हा दोघींची तिच्या सासवांची पण आहे दरवाजाने आत
येणाऱ्या आई आणि माजी एक सुरात म्हणाल्या शेखर जोशी मठातून बाहेर पडताना माझ्याच वयाच्या एका युवकाने मला हाक मारली "पंचम ओळखले नाही मला"मी शेखर, शेखर जोशी "शेखर जोशी माझा बाल मित्र ,कित्येक वर्षांनी तो मला आज भेटत होता ,शेखर आणि मी शाळेत एकाच वर्गात होतो ,शेखर माझा जीवश्च कंठश्च मित्र होता अभ्यासात मी आणि शेखर सतत पुढे असायचो ,कधी त्याचा पहिला नंबर तर कधी माझा ,अशी शर्यत असायची ,शेखर मध्ये बरेच कलागुणही होते ,चित्र काढणे रांगोळ्या काढणे ,किल्ले बनवणे ,दिवाळीला कंदील करणे ,गणपतीला आरास करणे इत्यादी उपक्रमात शेखर आमचा बिनीचा शिलेदार होता .त्याच्या मदतीने आम्हालाही पारितोषिके मिळायची , शेखर आम्हा दोनी भावांचा माझा आणि चैतुचा मित्र होता , एक वर्षी शेखर नेहमी प्रमाणे आमच्या मदतीला आला नव्हता म्हणून मी आणि चैतू दोघेही त्याच्या घरी भेटायला गेलो घरी बघितले तर घराला मोठे कुलूप होते,.शेखर कुठे आहे म्हणून आम्ही शेजारच्या खरे काकांच्या घरी गेलो पण त्यानाही ते माहित नव्हते दोन दिवसांनी खरे काका आमच्या घरी आले आणि त्यांनी आई बाबांना सांगितलेली एक दुखद बातमी आमच्या कानी आली कि रेल्वे प्रवासात शेखरच्या वडिलांचा मृत्यू झाला ,शेखरची आई आणि शेखर तिथे आपल्या मामा बरोबर तिथे गेले आणि आता शेखर आपल्या आई बरोबर त्याच्या अजोळीच राहणार आहेत त्याच्रआजोळ लांब कुठेतरी नागपूर जवळ होते , साधारण महिनाभराच्या अंतराने कळले कि वडिलांच्या अपघाती मृत्युच्या धक्क्याने त्याची आईही वारली आणि आता शेखर त्याच्या अजोळीच राहणार आहे , .आम्हाला मदत करणारा शेखर आता आमच्या गावात नाही आहे एवढाच त्याचा अर्थ आम्हाला कळत होता ,आमच्या साठी रोषणाई करणारा आमचा लाडक्या मित्राच्या आयुष्यात अंधारच झाला आहे हे मात्र आम्हाला समजण्याची जन झाली नव्हती काळाच्या ओघात आम्ही दोघेही भाऊ शेखरला जवळ जवळ विसरलोच होतो ,आज शेखर परत भेटल्या नंतर त्या आठवणीचा कडवसा समोर आला शेखर तू म्हणून शेखरला मी घट्ट निठी मारली एक दुखद स्वप्नातून जग आल्यासारखे मला वाटले ,आमच्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ,डोळे पुसतच आम्ही परत मठात शिरलो निस्तब्ध होतो दोघांनीही पादुकांवर डोके ठेवले मनोमन स्वामींचे आभार मानले ,समोरच्या प्रसादाच्या थाळीत एकाच पेढा होता गुरुजींनी तो शेखरच्या हातावर ठेवला ,,बाहेर आल्यावर शेखरने पेढ्याचे तीन तुकडे केले एक एक मला फीला एक स्वतः खाल्ला अंनि दुसरा माझ्या हातावर ठेवला ,हा कोणासाठी मी विचारले छोट्या चैतू साठी शेखर म्हणाला ,बालपणाच्या आठवणी परत उजळल्या होत्या ,चाल घरी चाल आता तुला कुठेही जाऊ देणार नाही मी ,बळे बळे ओढतच मी त्याला घरी घेऊन आलो ,घरी आल्यावर त्याची आणि आई बाबांची भेट झाली ,आईच्या प्रश्नाला हा शेखर जोशी म्हणून मी उत्तर देताच त्यांचीही प्रश्नाची सरबत्ती सुरु व्हायच्या आताच माजी आत आल्या आणि म्हणाल्या ग मुले भूकेजली दिसताहेत पहिल्यांदा त्या काही खायला दे आणि मग खाता खाता त्यांना बोलू दे, चलारे.हात हात पाय धुऊन या यात ,शेखरला घेऊन मी बेडरूम मध्ये गेलो .फ्रेश होऊन डायनिंग टेबला समोर बसलो , समोर गोड शिरा आणि भाजी ठेवली होती ,शिरयाच्या बशीतून एक चमचा तोंडात घातला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुंचे लोट वाहू लागले हुंदके देऊन तो रडू लागला ,एक क्षण सगळेच गोंधळलो ,इतक्यात माजी पुढे झाल्या त्याच्या जवळ जाऊन त्यांनी त्याचे डोके थोपटले आणि आपल्या पदारानीशेखर त्याचे डोळे पुसले आणि म्हणाल्या रडू नकोस शेखर सावर स्वतःला , शेखर हळू हळू शांत झाला ,त्याच्या मनातले एकटेपणाचे दुक्ख ओसरले होते ,बशीतला शिरायचा चमचा त्याच्या तोंडात घालून माजी म्हणाल्या हा तुझ्या आईचा घास समाज. शेखरच्या चेहऱ्यावर कृत्कृत्यतेचे भाव साई सारखे जमले होते.आज कुठे जायचं नाही कळल का दोन दिवसांनी बघू आपण ,तुलातर काही अडचण नाही ना ,लाजवू नकोस आई शेखर म्हणाला ,
. सकाळी उठलो तेव्हा शेखर स्थिरावलेला दिसला .आपले पणाच्या प्रेमाने दुक्खाचे ढग पांगले होते शेखर च्या हातात एक सोनेरी पदक होते शेखर माजींच्या समोर आला आणि ते त्यांनी माजींच्या पायावर ठेवले," शोध संपला "शेखर म्हणाला कसला? लोकेत पायावरून काढून पुसून हातात घेत माजी म्हणाल्या "पायांचा ,पदके चिकार मिळाली पण पायाच नव्हतेठेवायला आता ते हि मिळाले" वेडा मुलगा ह्याची खरी जागा हि बघ, त्याच्या गळ्यात ते घालत माजी म्हणाल्या , भारतातल्या नामांकित विद्यापीठाने सर्व प्रथम आल्याबद्दल स्नातकाला दिलेले ते अभियांत्रिकी शाखेचे पदक होते , त्या पदकाच्या सुवर्ण स्पर्शाने माझेही सर्व प्रश्न सोडवले होते ,हॉस्पिटलच्या बांधकामाचे सर्व काम निर्धास्तपणे मी शेखारवर सोपवले ,रात्रन दिवस मेहनत घेऊन शेखरने खर्चाच्या अंदाज सहित ते पूर्ण केले ,दादा आणि वाहिनी यायला दोनच दिवस होते आणि माझे सर्व कामही तयार होते .प्रचीती आली होती स्वामींच्या साथीची, मी त्याच्यावर कितीही रागावो पण माझा लाडका स्वामी मात्र सदैव माझ्या पाठीशी उभा राहत होता ,आपल्या प्रेमाचे अदृश्य महावस्त्र माझ्यावर पांघरणारा माझा स्वामी माझ्याकडे बघूनमिश्कील पणे हसतो आहे असे वाटत होते .
हॉस्पिटल च्या मुहूर्ताचा दिवस आला ,शेखरने फार सुंदर पद्धतीने बांधले होते .आवरारात शिरतानाच कुठूनही दिसावी अशी स्वामींची भाव मूर्ती आणि तिच्या मागे लावलेला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "असे आश्वासन देणारा एक शीला लेख अतिशय आश्वासक पद्धतीने लावला होता,दर्शनी भागात सर्व धर्म प्रार्थना स्थळ होते ,बंधूंचा एक भव्य दगडात कोरलेला पुतळा ,अन्नपूर्णा ,हे स्वयंपाक घर लहान मुलांच्या कक्षाचे नाव होते ममता.अत्यंत कल्पक पद्धतीने होस्पिटल बनवले होते.माझे भव्य केबिन ,वहिनींचे भव्य केबिन अतिशय कल्पकतेने बनविले होते ,
शुभारंभाच्या दिवशी सर्व शहर लोटले होते माधवराव जी माजी दादा आई बाबा सारे जण व्यवस्था बघत होते शेखरचे सर्वजण कौतुक करत होते अवघडलेली वहिनी नको नको म्हणत असतानाही काम करत होती,स्वामी समर्थ नावाची रामधून चालू होती,सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडत होते,,एक फोन खणाणला माजींच्याकडे कोणाला तरी बोलायचे होते.मी बोलतोय मला तुम्हाला भेटायचे आहे येऊ का ,"भावजी तुम्ही किती वर्षांनी तुमचा आवाज ऐकतेय ,जरूर या भावजी पण घरी नाही इथे मी युवराज सर्व हॉस्पिटल मधेच आहोत ,आलोच वहिनी ,थोड्याच वेळात रावसाहेब आणि एक व्यक्ती गाडीतून उतरले.मला आश्चर्याचा धक्काच बसला त्यांच्या बरोबर कुंतल मादाम उतरल्या ,रावसाहेबांनी सर्व हॉस्पिटल पहिले विनाशुल्क हॉस्पिटल मधले सुसज्ज ऑपेरेशन थेटर पाहून ते खुश झाले.माजीना पाहून म्हणाले वहिनी माझ्या मित्राचे नाव तुम्ही रोषन केले आहेत ,धन्य आहे तुमची आणि युवराजांची ,फक्त युवराजांची नव्हे भावजी ह्या माझ्या तीनीही मुलांची ,माजीने अम्हका तिघानाही बोलावले आणि आमची ओळख राव साहेबाशी करून दिली.युवराजांना तुम्ही ओळखताच ,हा माझा दुसरा मुलगा डॉक्टर पंचम ,आणि हा शेखर ,ज्यांनी हे हॉस्पिटल बांधले,वहिनी बंधूंना अमर केलाय तुम्ही आणि तुमच्या ह्या त्रिमूर्तीने ,आम्हा तिघानाही जवळ बोलवून आमच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांनी आशीर्वाद दिले ,कुंतल मदमाने वाहिनीन बरोबर फिरून पूर्ण वास्तू बघितली पसंतीची छटा त्यांच्या
चेहऱ्यावर उमटली होती ,माझ्या केबिन मध्ये त्या आल्या ,माझ्या पाठीवर पसंतीची थाप त्यांनी मारली आणि एक बंद लिफाफा कोणाच्याही नकळत माझ्या हातात दिला .रावसाहेब आणि कुंतल सर्वाना भेटून परत निघाल्या.
कार्यक्रम पूर्ण झाल्यावर घरी गेलो ,लिफाफा फोडला त्यात एक चिट्ठी होती "पंचम आयुष्यात मला नर खूप मिळाले पण पुरुष मात्र एकाच मिळाला ,ज्यांनी माझ्या अंगावर गुरु शिष्याच्या नात्याच्या मजबूत धाग्यात विणलेले महावस्त्र पांघरले ,त्या महावास्त्राची उब कायमची पुरेशी आहे,बाबांच्या सांगण्यावरून मी घर हॉस्पिटल साठी दिले आहेत कारण आता नि कायमची इथेच राहणार आहे,काहीच दिवसात इनामदार वकील तुला भेटतील,तूअनमान करणार नाहीस ...कुंतल.न कळत हात स्वामींच्या पुढे जोडले गेले बंधूंचे शब्द आठवले तारण तलावाच्या चुल्भर पाण्यात तुम्ही बुडणार नाहीत ह्याची खात्री आहे आम्हाला,घसरलो होतो पण तुळशीपत्राने सावरलं होते,थकून गेल्याने झोप लागली ,पहाटेच जाग आली टायगर भुंकण्याने टायगर आत आला आणि मला पराजात्काच्या झाडाकडे घेऊन गेला पारिजातक पुन्हा अवेळी फुलाला होता.

दुसर्या दिवशी सकाळी ,हॉस्पिटल मध्ये मी आणि वाहिनी गेलो ,सर्व जुनियर डॉक्टर आणि स्टाफ opd मध्ये आले सर्वाना मी आणि वहिनीनी काम समजून सांगितले ,वाहिनी रुग्णांना बघत होत्या इतक्यात त्यांना पोटात दुखायला लागले .घरी फोन करून सांगून मी मेट्रन आणि लेडी डॉक्टर च्या मदतीने लाबोर रूम मध्ये नेले , वाहिनी म्हणाल्या पंचम काळजी करू नकोस डिलिवरी नॉर्मल होईल ,काही लागलेच तर मेत्रोन तुला आत बोलावतील,बेस्ट ऑफ लक वाहिनी. लेडी डॉक्टर ने दरवाजा बंद केला ,एवढ्यात आई माजी बाबा दादा सर्व जन आले दादा थोडेसे नर्वस वाटत होते ,फार दुखतंय का तिला दादा मला म्हणाले ,त्याला काय विचारताय युवराज ह्या कला किती भयंकर तरीही सुखद असतात हे त्याला काय कळायचे ते काळात फक्त एका आईलाच ,५ मिनटात दरवाजे उघडून मेट्रन आणि डॉक्टर बाहेर आल्या अभिनंदन माजी तुम्ही आजी झालात ,अभिनंदन युवराज तुम्ही बाबा झाले आहात ,अभिनंदन डॉक्टर पंचम आपल्या हॉस्पिटल मध्ये झालेला पहिला जन्म आहे, , डॉक्टर पंचम प्रोतोकॅल प्रमाणे आपण प्रथम आत जाऊन बाळआला चेच्क करून मग इतरांना पाठवावे मेट्रन म्हणाल्या,दादांना चिडवत मी प्रथम आत गेलो वाहिनीन बाळाला तपासले आणि मग सर्वाना आत सोडले दादा आई माजी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दाटला होता ,बाळ चांगले गुटगुटीत होते ,हॉस्पिटल चे सर्व सहकारी मला अभिनंदन करायला जमले सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता,टायगर हि त्या आनंदात सामील झाला होता ,त्यालाही जणू बाळाला आणि वाहिनीन बघायचे होते ,वाह्निनी आतूनच आवाज दिला टायगर मी बरी आहे आणि बाळही ,जणू कळल्या सारखे करून तो आनंदाने भुंकला,थोड्या वेळाने माझ्या आणि दादाच्या कपड्यांना पकडून ओढू लागला ,काय झाले मी विचारले भुंकत भुंकत आम्हाला ओढून तो दर्शनी भागात घेऊन आला ,आणि स्वामी आणि बंधूंच्या फोटोसमोर उभा राहिला जणू त्यांना प्रणाम करायलाच तो सांगत होता,आमचे दोघांचेही डोळे पाणावले दादांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आजचा दिवस पाहायला बंधू शरीराने नाहीत पण मानाने इथेच आहेत.आपल्या सर्वांच्या जवळ.माझे हि मन भरून आले होते त्यांच्या आठवणीने डोळे पाणावले माझे दुक्ख दादांच्या मिठीत मी मोकळे केले,.

हॉस्पिटल आणि अभ्यासाच्या व्यापा पुढे मला कुठेही बघायला वेळ मिळत नव्हता ,राज्य सरकारने आणि अनेक सेवाभावी संस्थांनी

हॉस्पिटल च्या कार्याची दाखल घेतली ,आजू बाजूंच्या पंचक्रोशीत "बंधू"हे नाव आदराने उच्चारले जात होते ,माजी आणि आई जातीने हॉस्पिटल च्या अन्न पूर्णे कडे लक्ष घालत होत्या ,,सर्व काही आल बेल होते ,पण मन सदैव स्वामी वचनाची आठवण करून द्यायचे ,तू मी आणि बंधू कधीही दूर होणार नाहीत,मग मला ते नसल्याची आठवण का छळते येणारा माणूस जाणार हे माहित असूनही मी ते नाही आहेत आणि कधीही मला परत भेटणार नाहीत हे समजू का शकत नाही ,स्वामिनी सांगितलेल्या वचनाचा अर्थ काय का ते एक स्वप्नाच होते ,काहीच कळत नव्हते , नव्हते ,दिवसभराच्या थकव्याने झोप आली ,पाहते पहाटे एक तेजाचा पुंज खोलीत पसरला साक्षात स्वामी उभे दिसत होते ,तू मी आणि बंधू हे एक त्रिदल आहे एकमेकांपासून कधीही दूर न होणारे ,आमच्या ह्या वचनाची खात्री तुला लवकरच पटेल , तुमचे एकमेकांचे नाते कालातीत आहे आणि तसीच तुमची माझ्यावरची भक्ती प्रेम आणि भक्ती ह्या अडीच अक्षरी अद्वैताचा एक जिवंत साक्षात्कार तुला होईल हे आमचे वाचन आहे तू आणि बंधूंचे नाते मृत्यू संपवू शकणार नाही ते निरंतर अबाधित राहील त्याला सदैव आमचा आशीर्वाद राहील ,शांत झोप तुला दिलेले कार्य करत राहा .त्या अशीर्वाचानाने शांत झोप लागली ,सकाळी उठलो आणि बंधूंच्या फोटो समोर उभा राहिलो .त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाझरत होते ज्याच्या स्पर्श केवळ माझ्यासाठीच होता.


क्रमशः 
संदर्भ:मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :शशांक रांगणेकर
mitrancheramayan.blogspot.in
Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search