१/२९/२०१६

काय असतात ना ही नाती……….


काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली……..
काही जिवाभावने जपलेली
तर काही नुस्तीच नावापुरती उरलेली……..
काही नितळ प्रेमासाठी जगलेली
तर काही बांन्डगुळासारखी दुस-
याच्या जिवावर वाढलेली……..
काही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली
तर काही भितीपोटी गुपितासारखी
लपवलेली……..
काही मैत्रीच नाव दिलेली
तर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव
असलेली……..
काहि ओझ्यासारखी वाहीलेली
तर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी
जपलेली……..
काहि नकळत मनाशी जुळलेली
तर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली……..
काहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली
तर काही उराशी जिवापाड
सांभाळलेली……..
काहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली
तर काही मान-
अपमानाच्या ओझ्याखाली दबलेली……..
काही मोत्याहुन अनमोल ठरलेली
तर काही भंगारासारखी विकाया
काढलेली……..
काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली…..

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search