१/३१/२०१६

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 
ते तुमचं आणि आमचं कधीच समे नसत
तुमचं ते शुद्ध देसी प्रेम असतं
आणि आम्ही केला तर लफडं असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 
ते तुमचं आणि आमचं कधीच समे नसत
काय म्हणता आमच्या ओळी चिल्लर वाटतात ?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे , कोणी वाचल्या तर वाचू दे
तरी सुद्धा , तरी सुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 
ते तुमचं आणि आमचं कधीच समे नसत
"इश्क" का काय ते म्हणतात तसलं प्रेम आम्ही कधी केलं नाही 
उर्दू मधली गझल , अंन शायरी हि कधी गायली नाही 
व्याकरणात कायम चुकत गेलो 
आणि दर वेळा मराठी शाळेतच शिकत गेलो 
आमची सोळा वर्षे कधी सरली कळलं नाही
जागेपणी तर सोडाच पण झोपेतही आम्हाला कधी प्रेमाचं स्वप्न पडलं नाही
आठवतं मला अजूनही माझी सोळा जेव्हा सरली होती 
कॉलेज सोडून मी कामाची वाट धरली होती
कॉलेज कट्ट्यावर बसून मी मनसोक्त रडलो होतो 
मी तेव्हा पहिल्यांदा पैश्याचाच प्रेमात पडलो होतो 
तुमच्या प्रेमाचं गणित मला कधीच सुटलं नसत 
कारण 
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 
ते तुमचं आणि आमचं कधीच समे नसत
तुमचं ते शुद्ध देसी प्रेम असतं
आणि आम्ही केला तर लफडं असतं
प्रेम म्हणजे लई भारी म्हणणारी माणसे भेटतात 
प्रेम म्हणजे दुनियादारी म्हणणारीहि माणसे भेटतात 
असाच एक जन चक्क मला म्हणाला 
तू कधी कोणावर प्रेम केलं आहेस का ? प्रेमाने कधी कोणाला फुल दिलं आहेस का ?
प्रेम शिवाय तुझा जगणं व्यर्थ आहे , त्याच्या शिवाय तुझ्या पैशाला तरी काय अर्थ आहे
त्याला वाटलं मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 
ते तुमचं आणि आमचं कधीच समे नसत
तिच्या सोबत पावसात भिजणं आमच्या नशिबात न्हवतं
एक चोकलेट अर्ध अर्ध खायला कधी चोकलेट हि खिशात न्हवत
भर दुपारी उन्हात आम्ही काम करत होतो 
आणि आमच्या मालकालाच सलाम करत होतो
रात्री घरी उशिरा येवून आवरून घेणे फक्त मला माहित होतं
प्रेमळ ख़ुशी पासून घर माझं खूप लांब असायचं
कारण पुन्हा सकाळी जायचं असतं 
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 
ते तुमचं आणि आमचं कधीच समे नसत
प्रेम कधी रुसणं असत 
डोळ्यानीच हसन असतं
प्रेम कधी भांडतं सुद्धा
दोन ओळींच्या चीट्टीत सुद्धा प्रेम असतं
घट्ट घट्ट मिठीत सुद्धा प्रेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 
ते तुमचं आणि आमचं समे असतं

विक्रम पाटील

( आदरणीय कविवर्य मंगेश पाडगावकर यांची क्षमा मागून 
पाडगावकर रसिकहो कृपया याला विनोद बुद्धीने पाहून एक छोटा प्रयत्न समजावा 
मंगेश पाडगावकर यांची मूळ कविता ज्यांनी पूर्ण वाचली आहे त्यानांच हि कळू शकते )

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search