बर झाल तुझ 
माझ्यावर प्रेम नाही
एकमेकांनविना जगताना तुझ्या जीवाची 
घालमेल तरी होणार नाही
क्षण क्षण जागून
विचारात रात्र सरणार नाही
नात्याल नव्हता अंत तर
का भेटवल देवान
असले बाष्कळ प्रश्न
तुला पडणार नाही
बंद मनात साठलेल काही
पाणी होवून वहाणार नाही
खुप खुप कठीन असत
गुंतला जीव सोडवन
आठवणींच्या उकलत्या जखमांवर
स्वतःच फुंकर देवून स्वतःलाच सावरन
खरच बर झाल 
तुझ माझ्यावर प्रेम नाही
त्याच्याकडे पण आहे न्याय
याची खरच खात्री झालीय
नाहीतर तुझी जीवतुटती होरपळ
माझ्याच्यान पहावली नसती
आणि तू प्रत्येक क्षण सुखी व्हाव
ही प्रार्थना फळाला आली नसती
Blogger द्वारा समर्थित.