१/१८/२०१६

प्रेम कुणासही कळत नसतं


प्रेम आयुष्यात नाही आलं म्हणजे प्रेमभंग झाला 
असं कुठे असतं 
प्रेम जीवनात आल्यावर कुठलीही अपेक्षा न ठेवता 
फक्त प्रेम करत रहायच असतं 

शरिराने जरी जवळ नसलं तरी आपलं प्रेम 
आपल्या जवळच असतं 
धुंद होऊन मन एका वेगळ्या विश्वात 
बेधुंद जगत असतं 

प्रेम झालं म्हणजे ते मिळायलाच हवं 
असं कुठे असतं 
जरी ते जीवनात नाही येऊ शकलं तरी 
प्रेम त्यामुळेच कळलं असतं 

शरीरांच मिलन झालं म्हणजे पूर्णत्व आलं 
असं थोडचं असतं 
प्रेमाच्या अपूर्णतेतही सफल प्रेमाचं 
गुपीत दडलेलं असतं 

प्रेम दोन हृदयांच दोन आत्म्यांच असायला हवं 
शरीर निमित्त मात्र असतं 
जरी दोघांत राहिलं कायमचं अंतर 
प्रेम दोघांना फुलवत असतं 

अशी दोन सुंदर मनं भेटल्यावरच 
खंर प्रेम होत असतं 
असेलच दोष तर तो मनात असतो 
प्रेम सुंदरच असतं 

कुणास वाटेलही हा सगळा वेडेपणा पण 
प्रेम कुणासही कळत नसतं 
जो करतो निरागस , निरपेक्ष प्रेम 
प्रेम त्यालाच कळत असतं 

संजय एम निकुंभ

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search