गहीऱ्या भावना दाटलेल्या
लांब जाताना तूझ्यासवे सखे
अश्रू तूझे मी ओळखुन आहे
ईतके प्रेम आजवर दिलेस तू
माझ्याही नकळत मला
नयनांचा व्याकुळ बांध तूझा
आजही मला ठाऊक आहे
झुरतो प्रत्येकक्षणी मनकवडा मी
सखे फक्त तूझ्याच साठी
विरहातही तूझ्या अश्रूंना शपथ
माझ्याच ऊत्कट भेटीची
अपुर्ण असतिल जरी शब्द माझे
भावना माझ्या साक्ष आहेत.....!
काळजातल्या आठवांचे तरंग तूझे,
माझ्याभोवती आजही दाटले आहेत.........,
कवी - महेश फत्तरफोडे.