जाणीव आहे
मला तु माझी असण्याची
प्रेम तु ही
करते आहेस माझ्यावर
फक्त वाट
पाहत आहेस
नाव तुझे
माझ्या ओठांना ऐकण्याची
तुझं
रागावणं अन अबोल माझ्याशी धरणं
ठाऊक असुनही मी तुझाच तरी
संशय घेतेस तु मी दुसरया कुणाचा असण्याची
तुला वाटतं मीच तुला मनवावं
तुझ्या डोळयांत पाणी पाहून मी ही गहीवरावं
हो गं शोना मी तुला उदास पाहत नाही
वाटतं तुला हसत मी ठेवावं
अन ..
तुझे दुख ही मी माझ्याच नशिबात मागावं...
तुझे दु:ख मी माझ्याच नशिबात मागावं.. !!