२/२१/२०१६

एक उनाड कल्पना ..


आपण आपलं मस्तीत जगावं

हॉटेलात जावं.. खावं - प्यावं...
पोरींचं बिल उगाच भरू नये;
प्रेम कुणावरही करू नये! 
प्रेम म्हणजे एक अजब गेम असते
जिच्यासाठी आपण धडपडतो...तडफडतो
ती चक्क दुसऱ्याची डेम असते
सत्य ध्यानी आल्यावर फुक्कटचं झुरू नये;
प्रेम कुणावर करू नये! 
म्हणे- प्रेम म्हणजे एक पवित्रनातं असतं!
अहो, कसचं काय! प्रेम म्हणजे एकविचित्र जातं असतं...
दळणारं आंधळं दळ दळ दळत असतं
आणि पीठ मात्र भलतचं कुत्र खात असतं
आपण दळलेल्या पिठावर ऐऱ्यागैऱ्याने चरू नये;
म्हणून आपणच प्रेम कुणावर करू नये! 
चेहऱ्यावरचं चांदणं तिच्या
कितीही दुधाळ असलं,
गुलुगुलू बोलणं तिचं
कितीही मधाळ असलं,
तरी... शहाण्यानं मधमाशी हातात धरू नये;
प्रेम कुणावरही करू नये!


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search